वसई-विरारमध्ये 'या' कारणाने होतेय कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ

corona
corona

विरार : वसई-विरार महापालिका आणि ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईमध्ये कामाला असलेले येथील कर्मचारी, त्या ठिकाणी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळेच या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. 

वसई विरार पालिका आणि येथील ग्रामीण भागामधून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईतील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. कोणी बँक, शिक्षक, विविध रुग्णालयात परिचारिका, वार्डबॉय, सुरक्षा रक्षक, वेगवेगळ्या हॉटेल मध्ये कर्मचारी अशी कामे करत आहेत. या लोकांचा कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क आला. त्या नंतर ते कर्मचाऱ्यांचा घरातील लोक आणि बाजूच्या नागरिकांशी संपर्क आल्याने वसई विरारमध्ये कोरोनाच्या संशयितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. 

वसई-विरार मध्ये बहुजन विकास आघाडी, शिवसेना, जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट, साईबाबा मंदिर ट्रस्ट, समाधान फाउंडेशन, जागरूक नागरिक संस्था, विश्वकर्मा हॉल संस्था आपल्या कोरोनाच्या संकटकाळात मदतकार्य करत आहेत. वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर उपचार करणारी आरोग्य यंत्रणा काम करत असली तरी त्यांचे प्रयत्न अपुरे आहेत. यासाठी राज्य शासनाने याठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

वसई विरार मध्ये या लोकांमुळे पसरला कोरोना 
वसई विरारमध्ये 22 एप्रिल पर्यंत सापडेलेले रुग्ण. परदेशी प्रवासी (रुग्ण 6), जसलोक कर्मचारी (5), ताज हॉटेल कर्मचारी (4), मुंबईतील कर्मचारी (4), मुंबईतील वेगवेगळ्या हॉस्पिटल मधील कर्मचारी (4), मुंबईतील पोलीस (1), एअरपोर्ट कर्मचारी (2)

वसई विरार महानगर पालिका ही लहान पालिका असली तरी, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय केली आहे. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांची सोय करावी, त्यामुळे याठिकाणी कोरोनाचा प्रसार थांबेल अशी अपेक्षा आहे.
- उमेश नाईक मा. उपमहापौर, वसई विरार महानगर पालिका

Vasai-Virar Increase in corona patients due to mumbai working staff contact

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com