मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रसाद पुरोहितच्या दोषमुक्ततेच्या अर्जाला पिडीत व्यक्तीचा विरोध

सुनीता महामुणकर
Wednesday, 25 November 2020

मालेगावमध्ये सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बौम्बस्फोटमध्ये सहाजण ठार तर शंभरहून अधिक गंभीर जखमी झाले होते.

मुंबई, ता. 25 :  बारा वर्षांपूर्वी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी ले. कर्नल प्रसाद पुरोहितच्या दोषमुक्ततेच्या अर्जाला पिडीत व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात विरोध केला आहे. पिडीत व्यक्तीला बाजू मांडण्याचा अधिकार आहे, असा दावा त्यांच्या वतीने करण्यात आला.

बौम्बस्फोटमध्ये म्रुत्यु झालेल्या मुलाच्या वडिलांनी निसार अहमद बिलाल यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. आज या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. न्यायालय शुक्रवारी ता 27 रोजी यावर निर्णय देणार आहे.  

बिलाल यांनी अर्जाला विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पिडीत व्यक्तीला खटल्याच्या प्रत्येक टप्प्यावर बाजू मांडता येते, असे बिलाल यांच्या वतीने मांडण्यात आले.

मात्र, संबंधित अर्ज एनआयएने योग्य परवानगी न घेता खटला दाखल केला याबाबत आहे. यामध्ये अन्य पक्षकार बाजू मांडू शकत नाही, असा दावा पुरोहितच्या वतीने करण्यात आला आहे. मालेगावमध्ये सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बौम्बस्फोटमध्ये सहाजण ठार तर शंभरहून अधिक गंभीर जखमी झाले होते.

आतापर्यंत चारशे पैकी 140 साक्षीदारांचे जबाब झाले आहेत. नवनियुक्त न्यायाधीश शुक्रवारपासून खटल्याचे कामकाज सुरू करणार आहेत, असे एनआयएच्या वतीने एड. संदेश पाटील यांनी सांगितले.

या महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

>> "नोव्हेंबर महिन्यात शरद पवारांचा निरोप घेऊन २ बडे नेते वर्षावर गेले होते, निरोप होता राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यास तयार आहे" - प्रियम गांधी मोदी

>> सदाभाऊ खोत यांनी घेतली कोशारींची भेट; राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 नावे सूचवली

>>  TRP प्रकरणावर रिपब्लिक आणि अन्य वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेल्या समांतर मिडिया ट्रायलला मनाई करावी - राज्य सरकार

>>  सावधान, पुढे धोका आहे ! गेल्या दोन वर्षात मुंबईतील तीन रस्त्यांवर 126 जणांना मृत्यूने गाठलंय

>> 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 दरम्यान मतदार नोंदणीसाठी मुंबई शहरात विशेष मोहिमेचे आयोजन

( संपादन - सुमित बागुल )

Victim opposes Prasad Purohits plea for acquittal in Malegaon bomb blast case

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victim opposes Prasad Purohits plea for acquittal in Malegaon bomb blast case