परिस्थिती कशीही असो, आंदोलन सुरूच राहील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

नागपाड्यातील सीएए, एनपीआरविरोधात मुस्लिम आंदोलनकर्त्यांचा निर्धार

मुंबई : मरण तर कोठेही येईल, मरणाची भीती कशाला, आम्ही येथेच स्वच्छतेची व आरोग्याची काळजी घेत आहोत; मात्र काही केल्या आम्ही आंदोलन मागे घेणार नाही किंवा तहकूबही करणार नाही, असा निर्धार नागपाडा येथे आंदोलन करणाऱ्या मुस्लिम महिलांनी व्यक्त केला आहे.

साथीच्या रोगांमुळे जागतिक अर्थव्यवस्था होते डळमळीत; ३७ लाख कोटींचे वार्षिक नुकसान

सीएए, एनपीआरविरोधात नागपाड्यात सुरू असलेले मुस्लिम महिलांचे आंदोलन सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागे घेतले जाणार का असे विचारले जात होते; मात्र येथील महिला आंदोलन मागे घेण्यास किंवा तहकूब करण्यास अजिबात तयार नसल्याचे दिसून आले. कोरोना विषाणूचा फैलाव कमी होण्यासाठी सरकारने गर्दी कमी करण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मंदिरे बंद झाली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आंदोलनस्थळी स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे, चार डॉक्‍टर तसेच पॅरामेडिकलचे स्वयंसेवक मंडपात आहेत. सॅनिटायझरने हात धुतल्याशिवाय कोणालाही आत सोडले जात नाही, महिला बहुतांश बुरख्याने नाक-तोंड झाकूनच आहेत. आजपासून ताप मोजण्यासाठी उपकरणेही आणली जातील, ज्येष्ठ महिलांना व अल्पवयीन मुलांना शक्‍यतो सहभागी केले जात नाही, असे आयोजक-समन्वयक मरियम यांनी "सकाळ'ला सांगितले. 

हामुंबई लॉकडाऊनच्या दिशेने...

ईश्‍वर आम्हाला सुरक्षित ठेवेल!
मरण तर कोठेही येईल, संसर्ग तर घरी किंवा रस्त्यावरही होईल, येथे आम्ही पाच वेळा स्वच्छ हातपाय धुऊन नमाज पढतो. ईश्‍वर आम्हाला सुरक्षित ठेवेल, असेही काही ज्येष्ठ महिलांनी आवर्जून सांगितले. ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, सध्या एवढी काही आणीबाणीची परिस्थिती आलेली नाही, त्यामुळे सरकारने उगाच आम्हाला घाबरवू नये, असे आयोजक तोहा कुरेशी यांनी सांगितले. 

कोरोना राक्षसाला मारतायत आपल्याच शरीरातील 'हे' पोलिस, वाचा एक महत्त्वाचा रिपोर्ट !

मानसिक आरोग्यासाठी शिकवणी वर्ग
12 तास आंदोलन करणाऱ्या महिलांची मनस्थिती उत्तम राहावी, यासाठी येथे कॅलिग्राफी-एंब्रॉयडरी, कापडावर नक्षीकाम-रंगकाम यांचे शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. लहान मुलांसाठी याच विषयावर चित्रकलेचे वर्गही आहेत. कालच येथे स्वच्छता व आरोग्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना धार्मिक व शास्त्रीय दृष्टीने आरोग्याचे महत्त्व सांगतो, घरातही कोरोनाबाबत काळजी घ्यायचे आवाहन करतो, असे महिलांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉ. वसिका सेलिया यांनी "सकाळ'ला सांगितले. 

१०० टक्के 'वर्क फ्रॉम होम'ला कॉर्पोरेट सेक्टरचा होकार; CSR फंडातून होणार सरकारला मदत

पोलिसांचे सांगणेही धुडकावले
नागपाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी आंदोलकांच्या समन्वयकांशी चर्चा करून कोरोनामुळे आंदोलन तहकूब करण्याची विनंती केली; मात्र राज्य विधिमंडळाने सीएए, एनपीआरविरोधात ठराव केला तर तासाभरात आंदोलन बंद करू, अशी महिलांची भावना असल्याचे समन्वयकांनी पोलिसांना सांगितले.

Whatever the situation, the Nagpada movement will continue


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Whatever the situation, the Nagpada movement will continue