

Youth Dance in Flooded Streets
ESakal
मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाच्या धारा कोसळत आहेत. यामुळे अनेक भागात पाणी साचले असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर फटका बसत आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे काही मुलं पावसाचा मनसोक्त आनंद घेत पाण्याने भरलेल्या रस्त्यांवर ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहे. या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.