esakal | Coronavirus : नांदेड शहरात रुग्ण वाढ सुरुच, आज ४० पॉझिटिव्हची भर, तर ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

नांदेडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. कारण, मंगळवारी दिवसभरात (ता.१४) तब्बल ४० रुग्णांची वाढ झाली आहे. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ६९० झाली आहे. तर सोमवारी रात्री एकाचा मृत्यू झाला. 

Coronavirus : नांदेड शहरात रुग्ण वाढ सुरुच, आज ४० पॉझिटिव्हची भर, तर ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड :  नांदेडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. कारण, मंगळवारी दिवसभरात (ता.१४) तब्बल ४० रुग्णांची वाढ झाली आहे. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ६९० झाली आहे. तर सोमवारी रात्री एकाचा मृत्यू झाला. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

मंगळवारी (ता. १४) २५० अहवालापैकी १९६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ४० रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधित रुग्णांची संख्या ६९० इतकी झाली आहे. तर २६४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३४ रुग्णांची (१५ महिला व १९ पुरुष) प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगीतले. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

सोमवारी (ता.१३) रात्री मंगळवार पेठ हिंगोली येथील ४५ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार घेत होती. सदर महिलेला उच्च रक्तदाब मधुमेह व श्वसनाचे आजार होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित मृत रूग्णांची संख्या ३६ झाली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

आज नांदेड शहरातील रुग्ण 
वजीराबाद एक महिला (वय ३९), पद्मजा सिटी असर्जन चार पुरुष (वय ३६,३८,४४,५२) व दोन महिला (वय १४,३५), रहीमपूरनगर एक पुरुष (वय ४५), गणराज नगर एक पुरुष (वय ४५), गणीपुरा एक महिला (वय ६५), काबरा नगर एक पुरुष (वय २४), हडको नांदेड एक महिला (वय ६५).

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली  

आज नांदेड ग्रामीण मधील रुग्ण 
साधना नगर ता. देगलूर दोन पुरुष (वय १३,२१) व चार महिला (वय १०,१७,२९,६५), किनवट एक पुरुष (वय ३०), इमाम वाडी ता. कंधार एक महिला (वय २५), फुलवळ ता. कंधार एक पुरुष (वय ६४), मुक्रमाबाद एक पुरुष (वय ३१) व दोन महिला (वय २५,३२),  हासनाबाद ता. मुखेड एक महिला (वय २४), गोरक्षण गल्‍ली मुखेड दोन पुरुष (वय १०,३१) व एक महिला (वय ६५), बालाजी गल्ली नर्सी ता.नायगाव एक पुरुष (वय २८) व एक महिला (वय २२), शमा नगर नर्सी ता. नायगाव दोन पुरुष (वय १७,१९) व दोन महिला (वय ३७,१९), हदगाव एक महिला (वय ३५), गुजराती कॉलनी धर्माबाद एक पुरुष (वय ८३), पटेल नगर धर्माबाद एक पुरुष (वय ३८), ग्रामीण रुग्णालय धर्माबाद एक पुरुष (वय ३१), शिवाजीनगर धर्माबाद एक पुरुष (वय ६५), गंगाखेड जि. परभणी एक पुरुष (वय ४८).

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

कोरोना अपडेट

  • एकूण पॉझिटिव्ह - ६९०
  • मृत्यू- ३६
  • उपचार सुरू - २६४
  • सुटी दिली - ३९०
  •  
  • आजचे पॉझिटिव्ह - ४०
  • मृत्यू - १

(संपादन : प्रताप अवचार)