Coronavirus : नांदेडमध्ये आज २२ जणांना डिस्चार्ज, ४२ जण पॉझिटिव्ह, तर तिघांचा मृत्यू  

corona.jpg
corona.jpg

नांदेड : नांदेड जिल्ह्यात बुधवारी (ता.१५) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता आलेल्या अहवालात ४२ जणांना कोरोनाची लागण झाली. तर तीन बाधितांचा मृत्यू झाला. यात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. तर आज २२ बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण २६३ नमुन्यांपैकी २०१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ७३२ एवढी झाली आहे. यातील ४१२ बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 

आज २२ बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील ८ बाधित, मुखेड कोविड केअर सेंटर येथील ९, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील १ बाधित, खाजगी रुग्णालयातील २ बाधित आणि औरंगाबाद येथील संदर्भीत झालेले २ बाधित असे एकुण २२ बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  

मंगळवारी (ता.१४) जुलै रोजी रात्री बिलोली तालुक्यातील कासराळी येथील ६२ वर्षीय एक महिला, बुधवारी (ता.१५) जुलै रोजी देगलूर येथील ५८ वर्षीय एका वृद्धाचा, कंधार येथील ४६ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या ३९ एवढी झाली आहे.

  
या भागातील रुग्णांचा समावेश 
नवीन बाधितांमध्ये नांदेड गंगाचाळ येथील २४ व ५२ वर्षाच्या २ महिला, विजयनगर नांदेड येथील ४० वर्षाचा १ पुरुष, जुनामोंढा नांदेड येथील ५२ वर्षाचा १ पुरुष, छत्रपती चौक नांदेड येथील ४४ वर्षाचा १ पुरुष, सन्मान गार्डन वजिराबाद येथील ५८ वर्षाचा १ पुरुष, तरोडा नाका नांदेड येथील २४ वर्षाचा १ पुरुष, शीवरोड खंडोबा चौक रंघनाथनगर नांदेड येथील ३३ वर्षाचा १ पुरुष, वाजेगाव येथील २० वर्षाचा १ पुरुष, धनेगाव येथील १८ व २९ वर्षाचे २ पुरुष, देगलूर रोड देगलूर येथील ६५ वर्षाची १ महिला, मोतेवार गल्ली देगलूर येथील ३९ वर्षाचा १ पुरुष, देगलूर येथील नागोबा मंदिर येथील ४५ वर्षाचा १ पुरुष, देगलूर मोतेराम तांडा येथील ६० वर्षाचा १ पुरुष, देगलूर तालुक्यातील होट्टल बेस येथील ३२ वर्षाची १ महिला, देगलूर येथील अंबिका नगर येथील ७२ वर्षाची १ महिला, आनंदनगर देगलूर येथील ६० वर्षाचा १ पुरुष, माहूर येथील ३८ वर्षाचा १ पुरुष, नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील ५० वर्षाचा १ पुरुष, नायगाव तालुक्यातील बालाजी नगर नर्सी येथील ६६ वर्षाची १ महिला. 

बिलोली तालुक्यातील कासराळी येथील अनुक्रमे २२,४२,३२,६०,६०,६५ वर्षे वयाचे ६ पुरुष, २४ व ५५ वर्षाच्या २ महिला, मुखेड तालुक्यातील परतपुर येथील ६० वर्षाचा १ पुरुष, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील ४२ वर्षाचा १ पुरुष, मुखेड तालुक्यातील बामणी येथील २३,२४,२८ व ५५ वर्षाचे ४ पुरुष, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील ७५ वर्षाचा १ पुरुष व ७० वर्षाची १ महिला, लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील २४,२३,२६ वर्षाचे ३ पुरुष व ४७ वर्षाची १ महिला, लातूर सिटी येथील ४२ वर्षाची १ महिलेचा  यात समावेश आहे. 

आज रोजी २८१ पॉझिटिव्ह बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील २४ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात १२ महिला बाधित व १२ पुरुष बाधित आहेत. आज रोजी ३७७ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होतील. आज रोजी एकुण ७३२ बाधितांपैकी ३९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ४१२ बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

२८१ बाधितांवर येथे सुरु येथे सुरु आहेत उपचार 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ७४, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ८६, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ३२, नायगाव  कोविड केअर सेंटर येथे १४, जिल्हा रुग्णालय येथे ११, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १५, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे ५, किनवट कोविड केअर सेंटर येथे २, हदगाव कोविड केअर सेंटर येथे २, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ११ बाधित, माहूर कोविड केअर सेंटर १ बाधित तसेच नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात २३ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ५ बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. 

जिल्ह्याचे कोरोना मीटर  

  • सर्वेक्षण- १ लाख ४७ हजार ९९०,
  • घेतलेले स्वॅब- ८ हजार ९८०,
  • निगेटिव्ह स्वॅब- ७ हजार २५१
  • आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ४२
  • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ७३२,
  • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- २३,
  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
  • एकूण मृत्यू संख्या- ३९,
  • रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ४१२
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित - २८१,
  • प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या ३७७ 


कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल. 

डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक            

(संपादन : प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com