Nanded : पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका उदासीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PIK KARJ

Nanded : पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका उदासीन

हेही वाचा: Nanded : रेडीओचे स्थानिक प्रसारण पुर्ववत करावे

नांदेड : जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांना खरिपात ८९१.६१ कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले होते. परंतु आजपर्यंत केवळ ५५ टक्क्यांनुसार ४९६ कोटी १३ लाखांचे पिक कर्ज वाटप केले आहे. दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०२ टक्के तर ग्रामिण बँकेने १३० टक्के पिककर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ८१ टक्क्यांनुसार एक लाख ७३ हजार ९३८ शेतकर्‍यांना एक हजार २९४ कोटींचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

हेही वाचा: Nanded : अमृतमहोत्सवी वर्षात‌ मराठवाड्याला न्याय द्यावा; अशोक चव्हाण

जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मध्ये शेतकर्‍यांना एक हजार ५८१ कोटी ५९ लाख रुपये तर रब्बीसाठी ५६३ कोटी ८१ लाख असे एकूण दोन हजार १४५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २१ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले होते. या बाबत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तसेच विद्यमान जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देण्याची सूचना प्रत्येक बेठकीत दिली होती. परंतु राष्टीयीकृत तसेच खासगी बँकांनी मात्र पीक वाटपासाठी नेहमी प्रमाणे नकारघंटा दाखविली आहे.

हेही वाचा: Nanded : जिल्ह्यातील देवी मंदिरे घटस्थापनेसाठी सज्ज

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांना खरिपासाठी ८९१.६१ कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले होते. असे असताना आजपर्यंत या बँकांनी ५५ टक्क्यांनुसार ५९ हजार ७८ खातेदारांना ४९६ कोटी १३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०२ टक्क्यांनुसार ५७ हजार २६३ शेतकऱ्यांना ३६३ कोटी २३ लाखांचे पीक कर्ज वाटप केले आहे. तर महाराष्ट्र ग्रामिण बँकेला खरिपात ३३४ कोटी ८७ लाखांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले होते.

हेही वाचा: Nanded : ९१ हजार पात्र कुटुंबाची ई - केवायसी रखडलेलीच

या बँकेने आजपर्यंत १३० टक्क्यांनुसार ५७ हजार ५९७ शेतकऱ्यांना ४३४ कोटी ५४ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत खरिपासाठी एक हजार ५८१ कोटींच्या उदिष्टांपेकी एकूण ८१ टक्क्यांनुसार एक लाख ७३ हजार ९३८ शेतकऱ्यांना एक हजार २९३ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून देण्यात आली.

हेही वाचा: Nanded : जलधारा आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना विषबाधा

जिल्ह्यातील बँकनिहाय कर्ज वाटप स्थिती

(उद्दिष्ट व वाटप रक्कम कोटीत)

बँक कर्ज वाटप सभासद वाटप टक्केवारी

उदिष्ट संख्या रक्कम

महाराष्ट्र ग्रामीण बँक ३३४,८७ ५७,५९७ ४३४.५४ १२९.७६

जिल्हा मध्यवर्ती बँक ३५५.११ ५७,२६३ ३६३.१३ १०२.२९

व्यापारी/खासगी बँक ८९१.६१ ५९,०७८ ४९६.१३ ५५.६४

एकूण कर्ज वाटप १५८१.५९ १,७३,९३८ १२९३.३८ ८१.८१