नांदेडला कोरोनामुळे एकाचा मृत्यू तर ५९ जण आढळले पॉझिटिव्ह 

अभय कुळकजाईकर
Tuesday, 5 January 2021

नांदेडला मंगळवारी सायंकाळी ९९० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९२० निगेटिव्ह आले तर ५९ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या २१ हजार ६५७ झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे उपचार सुरू असलेल्या होळी, नांदेड येथील एका ७१ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ५७६ झाली आहे. 

नांदेड - कोरोना विषाणू संदर्भात मंगळवारी (ता. पाच) सायंकाळी आलेल्या अहवालात एकाचा मृत्यू झाला तर ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, आठ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे तर दिवसभरात ४१ रुग्णांवर औषधोपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी ९९० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९२० निगेटिव्ह आले तर ५९ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या २१ हजार ६५७ झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे उपचार सुरू असलेल्या होळी, नांदेड येथील एका ७१ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ५७६ झाली आहे. 

हेही वाचा - नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीत वाड्याला आले महत्त्व ; एका एका मतांची होतीय जुळवा जुळव 

आठ जणांची प्रकृती अतिगंभीर 
मंगळवारी ४१ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे आत्तापर्यंत सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या २० हजार ५३५ एवढी झाली आहे. सध्या ३४६ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी आठ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.८१ टक्के इतके आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७६ तर नांदेडच्या जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटलमध्ये ६१ खाटा उपलब्ध आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - कृष्णूर धान्य घोटाळ्यातील आरोपी वेणीकरांच्या अडचणीत वाढ, बिलोली न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला 

३४६ रुग्णांवर उपचार सुरू 
मंगळवारी ५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये नांदेड महापालिका हद्दीतील ३९, नांदेड ग्रामिण तीन, मुखेड पाच, हदगाव, कंधार, माहूर, मुदखेड येथील प्रत्येकी एक, हिंगोलीतील पाच आणि यवतमाळ येथील एका रुग्णाचा समावेश आहे. ३४६ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी नांदेड महापालिकेतंर्गत गृह विलगीकरणात १४४, जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृह विलगीकरणात ५४, खासगी रुग्णालयात ४२, विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात १२, नांदेड जिल्हा रुग्णालयात १९, नवीन इमारतीत २१, महसूल कोविड रुग्णालयात सहा, मुखेड कोविड रुग्णालयात २२, देगलूरला २२, किनवटला एक तर हैदराबाद येथे संदर्भित तीन रुग्णांचा समावेश आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - Good News : दक्षिण मध्य रेल्वेची महाराष्ट्रातील पहिली किसान रेल्वे नगरसोल येथून गुवाहाटीला रवाना 

नांदेड कोरोना मीटर

 • एकूण स्वॅब - एक लाख ८६ हजार २८
 • एकूण निगेटिव्ह - एक लाख ६० हजार २७५
 • एकूण पॉझिटिव्ह - २१ हजार ६५७
 • एकूण बरे - २० हजार ५३५
 • एकूण मृत्यू - ५७६
 • मंगळवारी पॉझिटिव्ह - ५९
 • मंगळवारी बरे - ४१
 • मंगळवारी मृत्यू - एक
 • सध्या उपचार सुरू - ३४६
 • अतिगंभीर रुग्ण - आठ
 • स्वॅब तपासणी प्रलंबित - ३९५

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nanded, one died due to corona and 59 were found positive, Nanded news

टॉपिकस