Nanded Crime | संजय बियाणींच्या पत्नीचे दीरावर आरोप, गुन्हा दाखल

संजय बियाणींच्या पत्नीचे दीरावर आरोप
nanded sanjay biyani murder case
nanded sanjay biyani murder case

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दोन महिन्यांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांना अटक केली असून तपास सुरू आहे. दरम्यान, संजय बियाणी यांची पत्नी अनिता बियाणी यांनी दीर प्रविण बियाणी यांच्यावरच गंभीर आरोप केले असून याबाबत नांदेड (Nanded) येथील विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हार्ड डिस्क चोरीचा गुन्हा सोमवारी (ता. सहा) दाखल करण्यात आला आहे. (Sanjay Biyani's Wife Allegation On Relative, Case Filed In Nanded)

nanded sanjay biyani murder case
लोक भाजप विरोधात बोलायला घाबरतात, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

संजय बियाणी हत्याकांड (Sanjay Biyani Murder) प्रकरणात पोलिसांनी कसून तपास करत आत्तापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे. पोलिस हत्येच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे या हत्येबाबत गृहकलहही समोर आला आहे. त्यांची पत्नी अनिता बियाणी यांनी दीर माजी नगरसेवक प्रविण बियाणी यांच्यावर आर्थिक व्यवहाराच्या नोंदी, हिशोब असलेल्या हार्ड डिस्क चोरल्याचा गंभीर आरोप केला आहे. आनंदनगर येथील राज मॉलमधील संजय बियाणी फायनान्स आॅफीसमधून शनिवारी (ता.चार) दुपारी तीनच्या सुमारास एक टीबी क्षमतेचा संपूर्ण आर्थिक व्यवहाराची माहिती असलेली हार्डडिस्क चोरून नेला आहे.

nanded sanjay biyani murder case
'पंतप्रधान मोदींचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळ भाजपाने आणलीय'

त्याचबरोबर फायनान्स व्यवसायातील संपूर्ण माहितीचा गैरवापर किंवा सदर माहिती पूर्णपणे नष्ट करण्याची शक्यता त्यांनी फिर्यादीमध्ये व्यक्त केली आहे. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान खात्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक काकडे करत आहेत. दरम्यान, माजी नगरसेवक प्रविण बियाणी यांना छातीत दुखत असल्याने कालच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांनी देखील आपल्याला अनिता बियाणी यांनी मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com