
Nanded Accident | नांदेडमध्ये एसटी-कंटेनरची धडक, सहा प्रवासी जखमी
अर्धापूर ( जि.नांदेड ) : तालुक्यातून जाणारा ३६१ नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग झाला आहे. नांदेड - वारंगा या रस्त्यावर दररोज अपघाताच्या घटना होत आहेत. अशा अपघाताच्या घटनेत अनेक जणांना आपल्या जीव मुकावे लागले आहे, तर काही कायमचे अपंग झाले आहेत. अपघातांच्या घटकांवर आळा घालण्यासाठी कोणतीच यंत्रणा काम करित नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच मार्गावर गुरूवारी सकाळी (ता.१२) बस (ST Bus) - कंटेनरचा समोरासमोर झालेल्या अपघातात (Accident) सहा प्रवासी जखमी झाले आहेत. (Six Passengers Injured In ST Bus Container Accident In Nanded)
हेही वाचा: जालन्यात दोन गटांमध्ये दगडफेक, शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरुन वाद
यात दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जखमींना उपचारासाठी नांदेड (Nanded) येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. हे काम सुरू झाल्यापासून गेल्या सात ते आठ महिन्यांत अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. या वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनेचे गांभीर्य कोणालाच नाही. मरत आहेत लोक, मरू द्या, आम्ही काही करणार नाही, अशा भूमिकेत संबंधित यंत्रणा आहेत काय अशा संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत.
हेही वाचा: Latur| बंधाऱ्यांची पाहणीसाठी आलेल्या अभियंत्यांवर मधमाशांचा हल्ला
नांदेडहून हिंगोलीकडे जाणाऱ्या (एमएच २६ बीएल १७०७) एसटीच्या बसचा वारंगाकडून नांदेडकडे येणाऱ्या कंटेरनचा (आरजे ३२ जीबी ७१०१) पार्डीजवळ समोरासमोर सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एसटीचे चालक रेश्माची फुले (वय ५५) हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच गंगाराम पवार (७५), गोदावरी पवार (६५ , दोघे रा. शाहपूर, ता.अर्धापूर) यशवंत लढे (४५ रा.मेंढला, ता.अर्धापूर) विजय राजे ( ७० रा. पुसद), सुभाष मस्के (६५) यांच्यासह अन्य पाच ते सात प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात होताच जखमींच्या मदतीसाठी श्याम मरकुंदे, नारायण देशमुख धावले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात डॉ आनंद शिंदे, चालक रणधीर लंगडे, रमाकांत शिंदे, ज्ञानेश्वर तिडके, गजानन कदम, संभाजी मोरे, वसंत सिनगारे दाखल केले.
Web Title: Six Passengers Injured In St Bus Container Accident In Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..