Navratri 2023 : नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईची कामाक्षीदेवी रूपात पूजा

कामाक्षीदेवीचे मंदिर तामिळनाडूतील कांचीपूरम या ठिकाणी आहे
Navratri 2023
Navratri 2023esakal

Navratri 2023 : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची कामाक्षीदेवी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. देवीच्या मागे तामिळनाडू येथील कांचिपुरम मंदिराची प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. 

दक्षिण भारतातील कांची हे शिव-वैष्णव शाक्त अशा अनेक परंपरांसाठी आदराचे स्थान आहे. शिवकांची विष्णू कांचीच्या रूपाने येथे भगवान शंकरांचे आणि नारायणाचे असे मंदिर आहे. तसेच आदिशक्तीच्या पराशक्ती रूपाचे अर्थात कामाक्षी देवीचे सुद्धा मंदिर आहे. या मंदिरातील देवीच्या रूपात आज अंबामातेची आकर्षक पूजा बांधण्यात आली.

मदनाच्या राखेतून जन्मलेल्या भंडासूर नावाच्या राक्षसाचा संहार करायला आदिशक्तीने भगवती ललितेचा अवतार धारण केला.

Navratri 2023
Navratri 2023 : रायता,टिक्की आणि बरंच काही; अवघ्या ५ मिनिटात तयार होतात उपवासाचे हे पदार्थ
आईची सालंकृती पूजा
आईची सालंकृती पूजाesakal
आईची सालंकृती पूजा
आईची सालंकृती पूजाesakal

श्रीचक्र रुपी रथावरती विराजमान होऊन जगदंबेने भंडासुराचा वध केला. सर्व जगत आनंदात असताना मदनाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या रतीने मातेला आपला पती पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली त्याला अनुसरून भगवतीने केवळ आपल्या नेत्र कटाक्षाने मदनाला पुन्हा सजीव केले म्हणून तिला कामाक्षी म्हटले जाते अशी ही कथा प्रचलित आहे.

कामाक्षी देवी चतुर्भुज असून ती पद्मासनात आपल्या पंचब्रम्हासनावर विराजमान आहे. तिने पाश, अंकुश, इक्षुदंड अर्थात ऊस आणि पंच पुष्प बाण अशी आयुधं धारण केलेली आहेत. देवीने आपल्या मुकुटावर अर्धचंद्र धारण केलेला आहे.

तर एका बाजूला शुक अर्थात पोपट बसलेला आहे. देवीच्या मूर्तीसमोर आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेले योनीपीठाच्या आकाराचे श्रीचक्र , श्री यंत्र आहे. (Navratri 2023)

Navratri 2023
Navratri Festival : सौंदत्ती डोंगरावर रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; 'उदे गं आई उदे'चा जयघोष

अशी ही कामाक्षी रुपिणी जगदंबा समस्त विश्वावर आपली प्रेमळ दृष्टी टाकून सकल भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. ही पूजा आनंद मुनीश्वर, किरण. मुनीश्वर,मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडिंकर यांनी बांधली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com