Navratri Ashtami Puja : या कारणामुळे करतात अष्टमीला महागौरी पुजन; जाणून घ्या महत्व

Ashtami Puja
Ashtami PujaEsakal

Shardiya Navratri 2022 : शारदिय नवरात्रोत्सवात आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमी तिथीला दुर्गेचा आठवा अवतार महागौरीचे पुजन केले जाते. यासह घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे देवीचे पुजन केले जाते. यादिवशी कुमारिका पुजनाचेही विशेष महत्व आहे. अष्टमी तिथीचे विशेष महत्व पुराणात सांगितले आहे. यासह देवीला महागौरी हे नाव कसे पडले या सर्वांची माहिती आपण धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे यांच्याकडून जाणून घेवूया. (Shardiya Navratri Ashtami Puja 2022 Ghatasthapana Mahagauri kumarika Puja Spiritual significance and importance)

Ashtami Puja
Shardiya Navratri 2022 : या मंत्राने करा नवदुर्गा देवीची उपासना; पापांचा होईल नाश, नियम जाणून घ्या

...असे आहे अष्टमीचे महत्व

पं. धारणे सांगतात, मार्कंडेय पुराणामध्ये अष्टमी तिथीला देवी पूजनाचे महत्व सांगितले आहे. त्यानुसार अष्टमीला देवी पूजन केल्याने सगळ्या प्रकारचे मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास दूर होतात. घरामध्ये कधीच दारिद्रता येत नाही. ज्योतिष शास्त्रात अष्टमी तिथीस बलवान आणि व्याधी नाशक तिथी सांगितले आहे. या तिथीची देवता शंकर भगवान आहेत.

...यामुळे देवीला पडले महागौरी हे नाव

नवरात्राच्या आठव्या दिवसास महाष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणतात. या दिवशी महागौरी देवीचे पुजन केले जाते. दुर्गा देवीचे आठवे स्वरूप महागौरी आहे. पापमुक्तीसाठी याचे महत्व आहे. अनेक वर्ष कठोर तप केल्यामुळे माता पार्वतीचा रंग गौर वर्ण झाला होता. शंकरांनी मातेला गौर वर्णचे वरदान दिले ज्यामुळे देवीला महागौरी नाव पडले.

Ashtami Puja
Navratri 2022: असुरांचा नायनाट करणाऱ्या षष्ठदुर्गा श्री महाकालीदेवीचा इतिहास..

...म्हणून करावे कुमारिका पुजन

अष्टमीला कुमारीका पुजन परंपरा, नवरात्री नारीशक्ति तसेच कन्या सन्मानाचे पर्व सुद्धा मानले जाते. त्यामुळे नवरात्रीत कुमारी कन्या पुजन भोजन परंपरा आहे. 2 वर्ष वयापासुन ते 11 वर्ष वयापर्यंतच्या कुमारिकांचे पुजन केले जाते. वेगवेगळ्या वयातील कन्या देवीची वेगवेगळी रूप दाखवतात.

स्कंद पुराणात कुमारिकेच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार ते पुढील प्रमाणे -

२ वर्षाची- कुमारी

३ वर्षाची -त्रिमूर्तीनी

४ वर्षाची -कल्याणी

५ वर्षाची - रोहिणी

६ वर्षाची -काली

७ वर्षाची -चंडिका

८ वर्षाची -शांभवी

९ वर्षाची - दुर्गा

१० वर्षाची-सुभद्रा

Ashtami Puja
Shardiya Navratri 2022 : तुम्हाला माहिती आहे का? नवरात्रीचा इतिहास श्रीरामाशी संबंधित, जाणून घ्या

महागौरीची आराधना केल्यामुळे व्यक्तीला सुख-समृद्धि आणि सौभाग्य प्राप्त होते.

* महागौरी बीज मंत्र -

ओम श्री क्लीं ह्रीं वरदायै नमः

* महागौरी मंत्र

1) माहेश्वरी वृष आरूढ़ कौमारी शिखिवाहना |

श्वेत रूप धरा देवी ईश्वरी वृष वाहना ||

2) ओम देवी महागौर्यै नमः |

Ashtami Puja
Shardiya Navratri 2022 : दैत्यांचा वध करण्यासाठी देवतांनी दिले देवीला शस्त्र; जाणून कोणी काय दिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com