शेतकऱ्यांना 392 कोटींची कर्जमाफी 

392 crore loan waiver to farmers say satej patil
392 crore loan waiver to farmers say satej patil

 कोल्हापूर  : शासनाने राज्यातील आर्थिकदृष्टया अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि राष्ट्रीयकृत बॅंकांमधील 57 हजार 196 शेतकऱ्यांना 391 कोटी 96 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस मिळणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. 

70 व्या प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या शासकीय समारंभात बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले "" जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे 78 हजार 228 हेक्‍टरवरील तीन लाखांवर शेतकरी बाधीत झाले तर अवकाळी पावसामुळे 1584 हेक्‍टरवरील 7861 शेतकरी बाधीत झाले आहेत. या बाधीत शेतकऱ्यांना रोख स्वरुपातील 160 कोटींची मदत तसेच 295 कोटींची मदत कर्जमाफीच्या माध्यमातून सहकार विभागाकडून प्रस्तावित केली आहे. जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असणाऱ्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.'' 
असे सांगून ते म्हणाले, ""जिल्ह्यात यावर्षी 7 कोटीचा कृषी यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकरी गटांना प्रोत्साहनासाठी गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादीत मालावर प्रक्रिया करण्यासाठी 13 कोटींची योजना राबविली जात आहे.'' 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर ऍड. सूरमंजिरी लाटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक वत्यांचे नातेवाईक उपस्थित होते. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या संचलनात कोल्हापूर महापालिका अग्निशमन दलाने विशेष लक्षवेधी सादरीकरण केले यात खाकी गणवेशातील 21 जवानांचे संचालन व त्यासोबत अग्निशामक बंब त्यावर अग्निप्रतिरोधक वेशभूषा केलेला जवान पूर काळात मदत करण्यासाठीची बोट अग्नी प्रतिबंधक साधनसामुग्री असे सूसज्ज सादरीकरण करीत सर्व चे लक्ष वेधले. ध्वजारोहणानंतर सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, पुरुष गृह रक्षक पथक, महिला गृह रक्षक पथक, वन रक्षक दल, एनसीसी पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरण चित्ररथ, बेटी बचाओ बेटी पढाओ चित्ररथ, शिक्षण विभागाचा चित्ररथ, तंटामुक्त अभियान चित्ररथ, जवानांच्या शानदार संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. 

वनविभागाचे वाहन संचलनात नव्हते 
प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनात नागरी सुरक्षेशी संबंधित सर्व शासकीय विभागांनी आपल्या विभागाची संरक्षण पुरक वहाने सहभागी केली. होती मात्र वनविभागाकडे यंदा प्रथमच लोकसंरक्षणासाठी सक्रिय झालेली वन्यजीव रेस्क्‍यु व्हेन या संचलनात सहभागी न केल्याने वनविभागाचे वेगळे वैशिष्ट्य लोकांच्या नजरेत आड राहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com