तत्परतेमुळेच फुटली दानोळी खुनाला वाचा

jaysingpur police investigation for murder
jaysingpur police investigation for murder

 जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलिसांच्या तत्परतेमुळेच दानोळीतील खूनाला वाचा फुटली. खूनाची माहिती मिळताच अंकली टोल नाक्‍यावर धाव घेत नाकाबंदी करत मृतदेहासह संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गंभीर गुन्हा उघडकीस आणला. 
गुटख्याच्या चोरीच्या संशयातून बेंगलोरच्या अर्जुन जगदीश याचा इलेक्‍ट्रिक शॉक, हॉकी स्टीक, लाकडी दांडक्‍याने मारहाण करुन जखमांवर चटणीचे पाणी ओतून अमानुष खून केला. अन्य दोघांनाही मारहाण केली. मृतदेहासह वाहने जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर नेत असतानाच रात्री बाराच्या सुमारास जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी पथकासह अंकली टोल नाक्‍यावर नाकाबंदी करत मृतदेह आणि संशयितांना अलगदपणे ताब्यात घेऊन गंभीर गुन्हा उघडकीस आणला. 

जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील 185 मोबाईल आणि रोकड चोरी प्रकरणामुळे जयसिंगपूर पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली होती. मात्र, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिगिड्डे यांनी कसून तपास करत मुद्देमालासह दोघांना अटक केली. मात्र, पोलिस ठाण्यातच चोरी होणे ही बाब मात्र अनेकांना असुरक्षिततेची भावना निर्माण करुन देणारी ठरली. पोलिस ठाण्याच्या हद्दीत हाणामारी, चोरीच्या घटनांची मालिका सुरु असताना जयसिंगपूर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

दानोळीतील खूनाला कौशल्याने वाचा फोडून जयसिंगपूर पोलिसांनी प्रतिमेला पुन्हा झळाळी देण्याचा प्रयत्न केला आहे. खूनातील अद्याप सहा जण बेपत्ता असून यामध्ये दानोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश दळवीचा समोवश आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हाणामारीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी गावागावात बैठका घेऊन कायद्याचे प्रबोधन करण्याची गरज आहे. 

मुद्देमाल दोन दिवसात फिर्यादीच्या ताब्यात 
जयसिंगपूर बसस्थानकावरुन तेरा तोळे सोने चोरीला जाण्याची घटना घडली. फिर्याद दाखल होताचा पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी तपास गतीमान करुन दोन दिवसांत दोन महिलांना अटक करुन त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला. दोनच दिवसात आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन जयसिंगपूर पोलिस कर्तव्यदक्ष असल्याचे दाखवून दिले. 
 

खूनातील म्होरक्‍या अद्याप फरार 
दानोळीतील खून प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश दळवीसह समीर जहॉंगीर पट्टेकरी (इचलकरंजी), साजिद पाटणी (रा. मुंबई, सध्या रा. अप्सरा हॉटेल जवळ मिरज) हे संशयीत अद्याप फरार आहेत. कोल्हापूर, इचलकरंजी स्थानिक गुन्हा अन्वेषणसह जयसिंगपूर पोलिस त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, ताब्यातील सहा जण पोलिस कोठडीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com