Video : फेरीवाल्यांचा कोल्हापुरात एल्गार; रणरणत्या उन्हातच पार्किंगमध्ये मारला ठिय्या; पाहा व्हिडीओ

kolhapur shivaji market parking agitation kolhapur marathi news
kolhapur shivaji market parking agitation kolhapur marathi news

 कोल्हापूर: महापालिकेच्या नियोजित अतिक्रमण कारवाई विरोधात फेरीवाल्यांनी आज एल्गार पुकारला. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता सकाळी दहापासूनच त्यांनी शिवाजी मार्केटच्या पार्किंगमध्ये ठिय्या मारला. राष्ट्रीय फेरीवाले धोरणाची पहिल्यांदा अंमलबजावणी करा नंतर अतिक्रमण काढण्याची मोहिम राबवा असा इशारा देण्यात आला. 


महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून (ता. 9) अतिक्रमण हटाओच्या मोहिमेचे नियोजन केले आहे. त्या विरोधात आज सकाळपासूनच व्यवसाय बंद ठेऊन फेरीवाले छत्रपती शिवाजी चौकात एकत्रित आले.महिला फेरीवाल्यांची संख्या मोठी होती. अंबाबाई मंदिरापासून शंभर मीटरपर्यत फेरीवाले काढण्याचे नियोजन आहे.  रोजी रोटीचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याने फेरीवाल्यात संतापाची भावना होती. सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, माजी महापौर नंदकुमार वळंजू, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे. प्र. द, गणपुले. अशोक भंडारे, समीर नदाफ, रियाज बागवान, राजू जाधव, किशोर घाटगे, आदि उपस्थित होते. 

फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा पत्ता नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे काही फेरीवाल्यांकडे अद्याप बायोमेट्रिक कार्ड नाहीत. फेरीवाल्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. बड्या धेड्यांना संरक्षण देता आणि रस्त्यावर व्यवसाय करणऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई का करता? असा सवाल करण्यात आला. आयुक्त या शहरात नवीन आहेत. त्यांना चुकीची माहिती देऊन अधिकारी दिशाभूल त्यांची दिशाभूल करत आहेत. एकाही फेरीवाल्याला धक्का लागला तर याद राखा, त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही फेरीवाला नेत्यांनी दिला. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com