पंढरपूरमध्ये भिंत कोसळून एक वारकरी जागीच ठार; 2 जखमी

अभय जोशी
Sunday, 2 July 2017

पंढरपूर : येथील नवीन कराड नाका भागात वारकऱ्यांच्या पालावर लगतची भिंत कोसळून एक वारकरी जागीच ठार झाला, तर दोन वारकरी महिला किरकोळ जखमी झाल्या. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

पंढरपूर : येथील नवीन कराड नाका भागात वारकऱ्यांच्या पालावर लगतची भिंत कोसळून एक वारकरी जागीच ठार झाला, तर दोन वारकरी महिला किरकोळ जखमी झाल्या. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेची समजलेली माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील दिंडी सोहळ्यातील वारकरी येथील नवीन कराड नाक्‍याच्या पुढे मुक्कामास थांबले होते. तेथील लगतची जुनी भिंत आज दुपारी साडे तीनच्या सुमारास कोसळली. या घटनेत रामकिसन माधवराव कल्हाळे (वय 70, रा. पिंगळी जि. परभणी) या वारकऱ्याच्या डोक्‍यास गंभीर जखम होऊन त्याचा मृत्यू झाला.

तसेच, सुमनताई तुकाराम कुदळे (वय 65), मंजुळाबाई दत्तात्रय कुदळे (वय 60, रा. दोघीही जिंतूर, जि. परभणी) या किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

■ ई सकाळ वरील ताज्या बातम्या
ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी
यवतमाळ: मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
‘गळाभेट’ने पाषाणभिंतींना पाझर
चंद्रपूर: कावठी गावात बिबट्याची दहशत; बंदोबस्ताची मागणी
पुणे: पुरेसा पाऊस झाल्याने जुन्नरमध्ये भात लावणीची कामे सुरू
अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी अडकले विवाहबंधनात
राहुल देशपांडे यांनी घातली विठाईला साद
चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार
शाहरूख-अनुष्का देणार पब्जना भेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pandharpur wari 2017 solapur news warkari dies in wall collapse