सांगलीत सुमारे दोनशे वाहनांवर कारवाई; पाऊण लाखांचा दंड वसूल 

Traffic police action operation all out in Sangli
Traffic police action operation all out in Sangli

सांगली - जिल्हा पोलिस दलातर्फे काल जिल्हाभर ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक मनिषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उपाधीक्षक, सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दीडशेहून अधिक जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर पावणे दोनशे वाहनचालकांवर कारवाई करून पाऊण लाखांचा दंड वसूल करण्यात आला. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश अधीक्षक शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध चौक, कॉर्नर, ब्रिज, बायपास रस्ता, जंक्‍शन येथे विशेष नजर ठेवली जात आहे. 30 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या मोहिमे 150 अधिकारी, 234 पोलीस कर्मचारी 117 होमगार्डनी भाग घेतला. पोलिसांना चकवा देऊन पळणारे, विना परवाना देशी दारू विक्री करणारे, जुगार-मटका अशा विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.

चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. निर्धारीत वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल, पानपट्टी, धाबे अशा 11 ठिकाणी छापे टाकण्यात आले. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे थांबून दंगा मस्ती करणाऱ्या 25 जणांवर कारवाई झाली. जुगार खेळणाऱ्या दोघांवर खटला दाखल करण्यात आला. जिल्ह्यातील हिस्ट्रीशीटर असलेले 68 आरोपींची तपासणी केली. वॉरंटमधील 18 गुन्हेगार ताब्यात घेण्यात आले. 

रेकॉर्डवरील 68 गुन्हेगार तपासण्यात आले. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 25 जणांवर कारवाई करून खटले न्यायालयात पाठवण्यात आले. तडीपार तिघा आरोपींवर कारवाई करण्यात आली. हजारवर वाहनांची तपासणी करून 270 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 73 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला. पुढील टप्प्यात ही मोहीम व्यापक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com