नगर: संगमनेरच्या १३ गावे व ५८ वाडयांना टँकरने पाणीपुरवठा

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 20 जुलै 2017

तळेगाव दिघे (जि. नगर): ऐन पावसाळ्यात पंचायत समितीमार्फत संगमनेर तालुक्यातील १३ गावे व ५८ वाडयांना १३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाळ्यातही पाणीटंचाई धग कायम आहे.

संगमनेर तालुक्यातील दुष्काळपिडीत तळेगाव व निमोण भागात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणी टंचाईची धग पावसाळ्यात देखील कायम आहे. तलाव, ओढे, नाले अद्याप कोरडेठाक असून विहिरी व कूपनलिकांना पाण्याचे उद्भव वाढले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे.

तळेगाव भागातील निमोण, पिंपळे, सायखिंडी, औरंगपूर, चिकणी, निमगाव - भोजापूर, पानोडी, खांजापूर, पळसखेडे, कोंची, खळी, पारेगाव खुर्द, कऱ्हे या गावांमध्ये तसेच ५८ वाडयांना ७ शासकीय व ६ खासगी अशा एकूण १३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, अशी माहिती संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: Ahmednagar news sangamner water scarcity water supply tanker