महिलेनेच काढला सरकारी महिला वकीलाचा काटा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही कोणीही लाचेची मागणी करत असल्यास  1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

सातारा : जाचहाट प्रकरणात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी फलटणमधील सहायक सरकारी वकील ऍड. आकांक्षा कमलेश रणवरे यांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दहा हजार रुपये रक्‍कम स्वीकारताना ऍड. रणवरे यांना रंगेहात पकडले.
 
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी, एक जाचहाट प्रकरणाची सुनावणी फलटण न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये लवकर निकाल काढण्यासाठी सहायक सरकारी वकील ऍड. आकांक्षा रणवरे यांनी वीस हजारांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार एका महिलेने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) विभागात केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे समोर आले. सोमवारी लाचेची रक्‍कम घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा लावला. सोमवारी सायंकाळी लाचेची यातील दहा हजार रुपये रक्‍कम स्वीकारताना ऍड. आकांक्षा रणवरे यांना रंगेहात पकडले.
 
एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंदराव सपकाळ, संजय अडसूळ, श्रद्धा माने, शीतल सपकाळ यांच्या पथकाने कारवाई केली. सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही कोणीही लाचेची मागणी करत असल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

वाचा : राजेंना चीतपट करणाऱ्या पाटलांनी उलगडले यशाचे रहस्य

ट्रकमधून डिझेल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास चाेप

सातारा : पुणे- बंगळूर महामार्गावर बॉंबे चौकातील उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास काही चालकांनी बेदम मारहाण करून त्यास जखमी केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. संभाजी जाधव असे संबंधित चोरट्याचे नाव असून, त्याच्यावर सातारा शहर, बोरगाव, उंब्रज पोलिसात डिझेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 
बॉंबे रेस्टॉरंटनजीकच्या उड्डाण पुलाखाली रात्रीच्या वेळी अनेक ट्रकचालक आपले ट्रक उभे करतात. काही ट्रान्स्पोर्टची कार्यालये याच परिसरात आहेत. त्यामुळे ट्रक लावून काही ट्रकचालक तेथेच आराम करतात. संभाजी बबन जाधव (रा. अतीत, ता. जि. सातारा) हा रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलाच्या खाली आला. एका ट्रकमधील डिझेल काढू लागला. मात्र, डिझेल काढण्याच्या आवाजामुळे एक परप्रांतीय ट्रकचालक जागा झाला आणि त्याने संभाजीला पडकले. संभाजीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकचालकाने त्याला घट्ट पकडून ठेवले. यामुळे मोठा गोंधळ झाला आणि अन्य ट्रकचालकही जागे झाले. या वेळी संभाजीला धक्काबुक्की, मारहाणही करण्यात आली.

मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे संभाजीला ट्रकचालकांनी बैजू विश्वनाथन यांच्या ट्रान्स्पोर्टच्या कार्यालयात ठेवले. सोमवारी सकाळी ट्रान्स्पोर्टचे मालक आणि काही चालक येथे आल्यानंतर संभाजीला सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शहर पोलिस ठाणेचे हवालदार विजय देसाई तपास करत आहेत. 

हेही वाचा :  अखेर डॅडींनीच केला त्याचा खून

वाचा : 'या' बहाद्दराने मागितली चक्क वडापावाची खंडणी

हेही वाचा : मित्रानेच मित्राला नऊ लाखांना फसविले

वाचा : 'ते' मुलीस फरशी पुसयाला लावत; फिर्यादीत सावकारांची नावे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant Public Prosecutor Arrested taking Bribe