आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून पडळकरांनी घातले दंडवत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत राजकीय पक्षांमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता लागली आहे.

सांगली - शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सांगलीतील शिवसैनिक हरिदास पडळकर यांनी छत्रपती शिवाजी पुतळा ते गणपती मंदिरपर्यंत दंडवत घातले.

सांगलीचे आराध्य दैवत गणपतीला साकडे

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत राजकीय पक्षांमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता लागली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा आणि तो मान युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांना मिळावा, अशी प्रतिक्षा शिवसैनिकांना लागली आहे. त्यासाठी सांगलीचे आराध्य दैवत गणपतीला साकडे घालण्यासाठी श्री. पडळकर यांनी मारूती चौकातील शिवाजी महाराज पुतळा ते गणपती मंदिरपर्यंत दंडवत घालण्याचा निर्णय घेतला.

सायकल चालवा; गुडघे वाचवा; डाॅ. अनंत जोशींचा स्वानुभवातून सल्ला 

"जय भवानी-जय शिवाजी' च्या घोषणा

त्यानंतर आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी शिवाजी महाराज यांना अभिवादन करून दंडवत घालण्यास सुरवात केली. "जय भवानी-जय शिवाजी' च्या घोषणा कार्यकर्ते देत होते. रस्त्यावर थांबून अनेकजण दंडवत कशासाठी घालत आहेत याची विचारणा करत होते.

कोकणी शेतकरी आदित्यनां म्हणाला, आत्महत्येशिवाय पर्याय नायं 

शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पडळकरांचे काैतुक

काही वेळातच ते दंडवत घालत गणपती मंदिरात पोहोचले. त्यानंतर श्री. पडळकर यांनी गणपतीला साकडे घातले. त्यांच्या समवेत हरिदास लेंगरे, विनायक एडगे, सचिन वाघमोडे,
प्रदीप शिंदे, अनिकेत खांडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी श्री. पडळकर यांचे कौतुक केले. श्री. पडळकर हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत.

सांगली : वाळव्यातील ‘त्या’ तरुणासह दहा जण एटीएसच्या ताब्यात 

प्रतिवर्षी ते सांगली ते तुळजापूर दुचाकी रॅली काढून विविध प्रश्‍न घेऊन तुळजाभवानीला साकडे घालतात. आज आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनोख्या पद्धतीने दंडवत
घालत जाऊन साकडे घातले. याबद्दल सोशल मिडियावर देखील चर्चा रंगली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dandwat for Aaditya Thackeray To Become Chief Minister