Sangli Crime : सांगलीत नात्याला काळिमा फासणारी घटना! पोटच्या 20 वर्षांच्या मुलीवर नराधम बापाने केला बलात्कार
Sangli Crime News : पीडित मुलगी वीसवर्षीय असून ती शिक्षण (Education) घेत आहे. शनिवारी पहाटे ती बाथरूमसाठी उठली होती. ती बाथरूममधून बाहेर आल्यानंतर ‘तुझ्याशी बोलायचे आहे’ असे म्हणून बापाने तिला जवळ बोलावून घेतले.
सांगली : पोटच्या मुलीवर नराधम बापाने बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. शहरातील एका भागात शनिवारी (ता. ३) पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी (Sangli City Police) नराधम पित्याला तत्काळ गजाआड केले.