नवे वर्ष चाकरमान्यांसाठी "फिलगुड' ; सुट्यांच्या बोनसची संख्या मोठी 

नवे वर्ष चाकरमान्यांसाठी "फिलगुड' ; सुट्यांच्या बोनसची संख्या मोठी 

सोलापूर : आगामी वर्षांत चार सार्वजनिक सुट्या रविवारी येत आहेत. त्याचवेळी दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी सुट्यांची संख्या दोन आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या सहा सुट्या बुडणार आहेत. त्याचवेळी ऑगस्टमध्ये पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सार्वजनिक सुटी आल्याने रविवारला जोडून सुटी मिळणार आहे. याशिवाय काही महिन्यांत एक दिवसाची सुटी घेतली तर चार ते पाच दिवसाची सुटी मिळणार आहे. 

सामान्य प्रशासन विभागाने केली यादी जाहीर 
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 2020 मधील सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार 20 सार्वजनिक सुट्या आहेत तर चार सुट्या रविवारी आल्या आहेत. वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी बॅंकांसाठी एक दिवस जादा सुटी आहे. 

जानेवारी - फेब्रुवारीतील सुट्या 
प्रजासत्ताक दिन, पारसी नववर्ष दिन, मोहरम आणि दसरा रविवारी आहे. त्यामुळे या सुट्या बुडाल्या आहेत. त्याचवेळी बकरी ईद (1 ऑगस्ट) आणि स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) पहिल्या व तिसऱ्या शनिवारी आल्याने या सुट्यांचा बोनस मिळणार आहे. फेब्रुवारीत छत्रपती शिवाजी जयंती (बुधवार), महाशिवरात्री (शुक्रवार) आणि चौथा शनिवार (ता.22) व रविवार (ता.23) अशा सुट्या आहेत. 20 फेब्रुवारी रोजी एक दिवस सुटी टाकली तर सलग चार दिवस सुट्या उपभोगता येणार आहेत. 

एप्रिल ते ऑगस्टमधील सुट्या 
एप्रिलमध्ये गुड फ्रायडे (शुक्रवार), दुसरा शनिवार (ता.11), रविवार (ता.12) आणि मंगळवार (ता.14) अशा सुट्या आहेत. 13 एप्रिलची एक सुटी टाकली तर तब्बल पाच दिवस सुट्या उपभोगता येतील. मे मध्ये चौथा शनिवार (ता. 23), रविवार (ता.24) आणि रमजान ईद (सोमवार, ता.25) अशा सुट्या मिळतील. ऑगस्ट महिन्याची सुरवात सुटीने (बकरी ईद, ता. एक) होत आहे. तिसऱ्या शनिवारी (ता.15) स्वातंत्र्य दिन आल्याने जोडून सुट्या मिळणार आहेत. या महिन्यांत पाचपैकी तीन शनिवारी सुट्या आहेत. 

सलग तीन दिवस सुट्या 
नोव्हेंबरमध्ये लक्ष्मीपूजनाची (ता.14) सुटी बुडाली असली तरी रविवार (ता.15) आणि बलिप्रतिपदा (सोमवार, ता.16) सलग सुट्या मिळणार आहेत. गुरूनानक जयंती 30 नोव्हेंबर रोजी (सोमवारी) आल्याने शनिवार (ता.28) व रविवार (ता.29) सलग तीन दिवस सुट्या मिळणार आहेत. डिसेंबरमध्ये नाताळ (ता.25) शुक्रवारी आल्याने शनिवारी (ता.26) व रविवार (ता.27) सलग तीन दिवस सुट्या मिळणार आहेत. 

सार्वजनिक सुट्या याप्रमाणे 
छत्रपती शिवाजी महाराज जयंती (19 फेब्रुवारी, बुधवार), महाशिवरात्री (21 फेब्रुवारी, शुक्रवार), होळी-दुसरा दिवस (10 मार्च, मंगळवार), गुढीपाडवा (25 मार्च, बुधवार), रामनवमी (दोन एप्रिल, गुरुवार), महावीर जयंती (6 एप्रिल, सोमवार), गुडफ्रायडे (10 एप्रिल, शुक्रवार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल, मंगळवार), महाराष्ट्र दिन (1 मे, शुक्रवार), बुद्ध पौर्णिमा (7 मे, गुरुवार), रमझान ईद (25 मे, सोमवार), बकरी ईद (1 ऑगस्ट, शनिवार), स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट, शनिवार), गणेश चतुर्थी (22 ऑगस्ट, शनिवार), महात्मा गांधी जयंती (2 ऑक्‍टोबर, शुक्रवार), ईद ए मिलाद (30 ऑक्‍टोबर, शुक्रवार), दिवाळी अमावस्या लक्ष्मीपूजन (14 नोव्हेंबर, शनिवार), दिवाळी बलिप्रतिपदा (16 नोव्हेंबर, सोमवार), गुरूनानक जयंती (30 नोव्हेंबर, सोमवार) आणि ख्रिसमस - नाताळ (25 डिसेंबर, शुक्रवार). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com