sahitya samelan
sahitya samelan

उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाला सोलापूरी साज

सासुरे (सोलापूर) : उस्मानाबाद येथील मल्टीपर्पज ग्राऊंडवरील ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्री संत गोरोबाकाका कुंभार यांचे शिल्प वैराग (जि. सोलापूर) येथील शिल्पकार सुहास दत्तात्रय सुतार यांनी अवघ्या सात दिवसात बनविले आहे. संमेलनात सर्वांचे आकर्षण बनणारे हे गोरोबाकाकांचे शिल्प सर्वात मोठे शिल्प ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या सम्मेलनाला सोलापूरचा साज चढणार आहे.

हेही वाचा- संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे चांदीच्या पदकाने प्रदान करणार
असे आहे शिल्प

दोन्ही हातामध्ये चिपळ्या... चेहऱ्यावर स्मीत हास्य... अर्धोनमिलीत असलेले डोळे. आणि विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होऊन चिखल तुडवत असलेली तब्बल नऊफूट उंचीचे शिल्प १० दिवसांपासून  वैराग येथील शिल्पकार सुतार व त्यांचे सहायक प्रदिप निलाखे यांनी संत गोरोबाकाकांचे शिल्प बनविले आहे. हे शिल्प उस्मानाबाद येथील साहित्यनगरीत दाखल करण्यात येईल.  इतके मोठे व सर्वांचे आकर्षण असणाऱ्या काकांच्या या शिल्पकृतीची ग्रंथदिंडीसोबत शहरातून मिरवणूक काढण्यात येईल. त्याशिवाय संमेलनाचे उद्घाटन ही याच शिल्पकलेच्या पूजनाने होणार आहे. संमेलनात एका प्रमुख ठिाकाणी स्थान निश्चीत केले असून तेथे गोरोबाकाकांच्या घराचा सजिव देखावा ही उभारण्यात येत आहे. 

हेही वाचा- धर्म आणि साहित्याची गल्लत नको : मनोहर
राज्यातील मोठे शिल्प असल्याचा दावा

संमेलनाचे समन्वयक व प्रसिद्ध फोटोग्राफर तथा इतिहास संशोधक जयराज खोचरे यांनी सुतार यांचे आजवरचे काम पाहून त्यांच्याकडे शेवटच्या घटकेत हे काम सोपवले होते. सुतार यांनी दिवस रात्र काम करुन अवघ्या १० दिवसात पूर्ण केले आहे. अतिशय रेखीव पध्दतीने केलीले हे शिल्प राज्यातील सर्वात मोठे शिल्प असल्याचा त्यांनी दावा केला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ठरलेला आजवरचा क्रमबद्धपणा बाजूला सारून थोडे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न या संमेलनात केला जाणार आहे. यासाठी हा नवा प्रयोग या संमेलनात करण्यात आला आहे.

१० दिवसात शिल्प
माझ्या मनातील सर्व भाव या शिल्पात मी उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. दिवस रात्र मेहनत घेऊन १० दिवसात शिल्प बनविले आहे. नऊ फूट उंच असलेले काकांचे हे शिल्प सर्वात मोठे आहे.
- सुहास सुतार, शिल्पकार, वैराग

कोण आहेत हे शिल्पकार
सुहास सुतार हा वैराग येथील एका सुतार कारागिराचा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्यांना कलेची आवड आहे. त्यांनी पुणे व कोल्हापूर येथून जी. डी. आर्ट येथे पूर्ण केले. विद्यापीठातून शिल्पकलेत सुवर्णपदक विजेते, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, आहिल्यादेवी यांचे पुतळे त्यांनी बनविले आहेत. मुंबईतील संग्रहालयामध्ये त्यांनी सचिन पीळगावकर, अमरीष पुरी यांचे पुतळे त्यांनी बनविले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com