कोल्हापूर: वनविभागाच्या नर्सरीवर पाऊण कोटीचा धाडसी दरोडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

चंदन लाकूड व तेल पळविले; दोघा सुरक्षारक्षकांना जबर मारहाण

चंदन लाकूड व तेल पळविले; दोघा सुरक्षारक्षकांना जबर मारहाण

कोल्हापूर : पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेला चंदन लाकूड व तेल साठा वनविभागाच्या चिखली (ता. करवीर) शासकीय नर्सरीतून अज्ञात टोळीने दरोडा टाकून लंपास केला. त्या मुद्दामालांची किंमत जवळपास पाऊन कोटी रूपयांच्या आसपास आहे. या मालाच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या दोन वनसुरक्षा रक्षकांना बांधून घालून चोरट्यांनी माल लंपास केला. एकाच वेळी शासकीय सुरक्षेत असलेल्या एवढ्या मोठ्या किंमतीच्या मुद्देमालाची प्रथमच धाडसी चोरीस झाली आहे. घटनास्थळी पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असून वनविभाग व पोलिस संयुक्त तपास करीत आहेत.

घटनास्थळ व विभागाच्या सुत्राकडून समजलेली माहिती अशी की, वनविभागाची चिखली येथे नर्सरी आहे येथे विविध प्रकारची झाडे तसेच तसेच वनउपक्रमासाठी लागणारे साहित्य ठेवले जाते यातील दोन विभागात विविध कारवाईत पोलिसांनी जप्त केलेली चंदनाचे लाकूड व चंदनाचे तेल ठेवले होते तेथे दोन सुरक्षारक्षक कायम स्वरूपी सुरक्षेसाठी ठेवले आहेत. काल रात्री दिड वाजण्याच्या सुमारास ते 8 ते 9 ते जणांचा एक गट गाडीतून आला. त्यांनी थेट गाडी नर्सरीत घातली आणि प्रथम सुरक्षारक्षकांना जबर मारहान केली त्यात कोयत्या सारख्या हत्यारांचा वापर झाला. त्यानंतर दोघां सुरक्षारक्षकांना चोरट्यांनी दोरीने बांधून घातले त्या दोघेजण सुरक्षा रक्षकांच्या लक्ष ठेवू राहीले त्यानंतर उर्वरीतांना मोठ्या गाडीतून निर्सरीत शोध घेत नेमकी चंदनाची लाकडे व चंदन तेलाचे डबे गाडी घातले. जाताना सुरक्षारक्षकांना बांधलेल्या स्थितीत तसेच ठेवून गेले जवळपास दोन तास चोरट्याचांहा धुमाखुळ सुरू होता.

अवती भोवती फारशी वर्दळ नसल्याने किंवा सुरक्षा रक्षकांना ओरडाता येणेही चोरट्यांनी मुश्‍कील केल्याने आत काय गोंधळ सुरू आहे याची फूसटशी कल्पनाही बाहेर येऊ शकली नाही. चोरटे पळून गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी कशी बशी सुटका करून घेत नर्सरी पासून एक किमी अंतर बाहेर चालत आले त्यांनी घडल्या घटनेची माहिती वनधिकाऱ्यांना कळविली त्यानंतर वनाअधिकारी व करवीर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. या कालावधीत चोरटे दूरवर निघून गेले होते पोलिस व वन विभागाने तपासाला सुरवात केली विविध पथके तातडीने विविध भागात रवाना केली आहेत.

चोरटे चंदन तस्कर असल्याचा संशय
नर्सरीत आलेले बहुतेक चोरटे तोडक्‍या मोडक्‍या हिंदी भाषेत बोलत होते त्यावरून ते परप्रांतीय असण्याची शक्‍यता वर्तविली आहे तर नर्सरीत अनेक लाकूड सामान व वनस्पती आहेत मात्र त्यातील नेमक्‍या चंदनाचे लाकूड अचूक शोधून तेवढीच लाकडे चोरट्यांनी घेतली यातून चोरटे हे सराईत चंदन तस्कार असावेत असाही अंदाज बांधला जात आहे. तर घटनास्थळी रात्री पावसाचा जोर असल्याने तेथे चिखल झाला आहे या चिखलात चोरट्यांनी जी गाडी आणली त्याच्या चाकांची वण उमठले आहेत. त्यावरून ही गाडी 407 किंवा टेंपो सदृष्य असावी असा अंदाज आहे.

वरिष्ठ अधिकार्याची भेट
जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते, पोलिस उपधिक्षक मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्‍ला व परिक्षेत्र वनाधिकारी विजय जाधव आदीनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सुचना केल्या त्यानुसार वनविभागाची चार तर पोलिसांनी तिन पथके कार्यरत झाली आहेत.

विविध कारवाईत जप्त केलेले चंदन लाकूड
अंदाजे दहा टन वजनाचे चंदनाची लाकडे व चंदन तेल होते यात तेलाचे 4 डबे अंदाजे किंमत सात लाख आहे तर चंदन लाकडाची किंमत 70 लाखांच्या वर आहे. गतवर्षी पेठ वडगाव पोलिसांनी तसेच कागल पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेले चंदनाचे लाकूड न्यायालयांच्या आदेशानुसार वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले होते तेच लाकूड निर्सरीत सुरक्षीत साठाकरून ठेवले होते. तेच चोरीला गेला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: kolhapur news Brave robbery at the forest department nursery