देश रक्षणासाठी धीरोदात्त सैनिक तयार व्हावेतः कर्नल मानस चौधरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

पन्हाळा (कोल्हापूर): देशात प्रथमच विनय नगर नवेपारगाव येथील सैनिक शाळेत कारगील विजय दिना निमित्त "आक्सीजन पार" ही कल्पना साकारण्यात आली. येथील वडाच्या झाडाखाली देशसेवेचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांमधून देश रक्षणासाठी धीरोदात्त सैनिक तयार व्हावेत, असे प्रतिपादन 56 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिग अधिकारी कर्नल मानस चौधरी यांनी बोलताना व्यक्त केले.

तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकादमी येथे कारगिल विजय दिवस समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमास शाहुवाडी पन्हाळा, राधानगरी, गगन बावडा विभागाचे पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील व प्रेरणा फौडेशन फॅार ब्लाईंडचे अध्यक्ष सतीश नावले, हणमंत जोशी, शर्वरी पाटील व मुख्याध्यापक टि. बी. ऱ्हाटवळ आदि मान्यवर उपस्थित होते.

कर्नल मानस चौधरी यांचे हस्ते कारगील युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना पुष्पचक्र वाहुन श्रद्धांजली देण्यात आली. उपअधिक्षक आर. आर. पाटील, सतीश नावले यांचे हस्ते वडाचे रोप लाऊन देशातील पहिला प्रेरक आक्सीजन पार स्थापन करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व नियोजन मिलिटरी अकादमीचे डी. ए. मुजावर यानी केले. आभार आर. एस. पाटील यानी मानले. कार्यक्रमावेळी मिलिटरी अकादमीचे विद्यार्थी, शिक्षक, जवान निर्देशक जे. एन. चौगुले, एस. तिरु व मान्यवर उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: kolhapur news kargil vijay diwas celebrate in panhala