
Kolhapur Army Jawan
esakal
घटना – सुट्टीवर घरी आलेल्या सचिन विलास सुतार (३९, रा. येळाणे, ता. शाहूवाडी) यांचे पत्नीसोबत वाद झाल्याने त्यांनी पत्नी प्रियांका सुतार (३१) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
जखमी – रागाच्या भरात कुकरचे झाकण डोक्यात मारल्याने प्रियांका सुतार जखमी झाल्या.
कायदेशीर कारवाई – या प्रकरणी सचिन सुतार यांच्यावर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Kolhapur Family Dispute News : सुटीवर घरी आलेल्या जवानाचे पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात त्याने कुकरचे झाकण डोक्यात मारल्याने पत्नी प्रियांका सुतार (वय ३१) या जखमी झाल्या. शुक्रवारी दुपारी झालेल्या मारहाणप्रकरणी सचिन विलास सुतार (वय ३९, रा. येळाणे, ता. शाहूवाडी) याच्यावर शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.