Election रणधुमाळी : महाडिकांची यंत्रणा मैदानात, गाठीभेटी वाढल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी निश्‍चित आहे.

Election रणधुमाळी : महाडिकांची यंत्रणा मैदानात, गाठीभेटी वाढल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीतील भाजपचा उमेदवार महाडिक कुटुंबातीलच असणार हे जवळपास स्पष्ट झाल्याने आजपासून प्रचार यंत्रणा सक्रिय करण्याचा निर्णय बैठकीत झाला. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीला माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील व महाडिक गटाचे शंभरहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, बैठकीनंतर रात्री माजी खासदार महाडिक, प्रा. पाटील यांनी पन्हाळा येथे भेट देऊन तेथील जनसुराज्यच्या नगरसेवकांची भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती.

निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी निश्‍चित आहे. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली असून त्यांची यंत्रणाही जिल्ह्यात कामाला लागली आहे. भाजपाचा उमेदवार ठरलेला नाही. दोन दिवसांपूर्वी उमेदवारीवर चर्चा झाली. त्यानंतर काल (ता. १२) भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. या भेटीत श्री. महाडिक यांच्या स्नूषा व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्याऐवजी स्वतः अमल यांनी रिंगणात उतरावे अशी काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काहीही झाले तरी भाजपकडून महाडिक कुटुंबातील उमेदवार निश्‍चित आहे. या पार्श्‍वभूमीवर आज प्रचार यंत्रणेबाबात माजी खासदार महाडिक यांच्या कार्यालयात बैठक झाली.

हेही वाचा: पहिले पंतप्रधान पंडित नेहरुंना PM मोदींची आदरांजली

निवडणुकीसाठी मंगळवारपासून (१६) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे उद्या रात्री किंवा सोमवारी भाजपचा उमेदवारीची घोषणा मुंबईतून होईल. त्यामुळे प्रचार व संपर्क यंत्रणा कशी राबवायची यावर बैठकीत चर्चा झाली. महाडिक कुटुंबातील काही सदस्यांसह प्रा. पाटील यांच्यासारख्यांकडे काही नगरपालिका व नगरसेवकांची जबाबदारी सोपवली. जिल्हा परिषद सदस्यांच्या भेटीची जबाबदारी स्वतः अमल व शौमिका यांच्याकडे आहे. विषेषतः आमदार प्रकाश आवाडे व विनय कोरे यांना मानणारे मतदार विरोधकांच्या हाताला लागणार नाहीत यासाठी विशेष यंत्रणा राबवण्याचेही ठरले.

महाडिकांची कारखान्यावरून यंत्रणा

मतदार संघाचे माजी आमदार महादेवराव महाडिक आज दिवसभर कसबा बावडा येथील राजाराम कारखान्यावर तळ ठोकून होते. तेथूनच त्यांनी काही नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांशी संपर्क साधला. काही जिल्हा परिषद सदस्यांनीही त्यांची भेट घेतली. कारखान्यांवर बसूनच श्री. महाडिक यांनी यंत्रणा कार्यरत केली.

हेही वाचा: त्रिपुराच्या नावावर महाराष्ट्रात घडलं ते लाजिरवाणं - त्रिपुराचे उपमुख्यमंत्री

loading image
go to top