
Kolhapur Politics : धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने काल झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून ‘गोकुळ’च्या जोडण्या लावण्यात आल्या. याच कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी, विरोधकांनी गेल्यावेळी ‘गोकुळ’ची सत्ता अपप्रचार करून मिळवल्याचे सांगतानाच आता हे मैदान मारायचेच म्हणून दिलेला इशारा, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी महादेवराव महाडिक यांच्या रंगलेल्या कानगोष्टी आणि या कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ यांनी साधलेली वेळ पाहता ‘गोकुळ’ च्या राजकारणाला आतापासूनच रंग चढल्याचे बोलले जाते.