
Gokul Dudh Ice Cream
esakal
Gokul Dudh Sangh Kolhapur : कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) ची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठ्या उत्साहात पार पडली. अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती राहिली. सुरुवातीपासूनच समर्थकांच्या जोरदार घोषणाबाजीत वातावरण तणावपूर्ण बनले होते.