Kolhapur Zilla Bank: हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचे 5 कर्मचारी ईडीच्या ताब्यात!

चौकशी करावी पण त्यांना त्रास दिला तर...., कर्मचारी संघटनेचा ईडीच्या अधिकाऱ्यांना इशारा
Hasan Mushrif
Hasan Mushrifesakal

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेची ईडीकडून कालपासून कसून तपासणी सुरु आहे. ईडीनं चौकशीदरम्यान पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यामुळं इतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून जर ईडीनं त्यांना त्रास दिला तर ईडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करु, असा इशारा कर्मचारी संघटनेनं दिला आहे. (Hasan Mushrif Five employees of Kolhapur Zilla Bank headed by Hasan Mushrif are in custody of ED)

Hasan Mushrif
Maharashtra Budget 2023: 'तुमच्या संकल्पनेतील महाबजेट'; फडणवीसांची जनतेकडून मागवल्या आयडिया

कालपासून सुरु झालेली ही चौकशी आजही सुरु होती, गेल्या तीस तासांपासून ही चौकशी सुरु असून ईडीचे अधिकारी बँकेतून कागदपत्रे घेऊन गेले असून या बँकेत झाडाझडती सुरु होती. ज्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ईडीचे अधिकारी मुंबईला घेऊन गेले आहेत ते प्रचंड ताणतणावाखाली असल्याचंही कर्मचारी संघटनेनं म्हटलं आहे.

Hasan Mushrif
Perfume IED: परफ्युम बॉम्ब! स्फोटासाठी दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच वापरला नवा फंडा

कर्मचाऱ्यांची भूमिका काय?

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ईडीच्या चौकशीला विरोध केलेला नाही. मात्र, त्याचं म्हणणं आहे की, अधिकारी कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी थांबवून घेत आहेत हे चुकीचं आहे. आज बँक सुटायच्यावेळाला त्यांनी कर्मचाऱ्यांना सोडयला हवं अशी भूमिकाही त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. गेल्या तीस तासांपासून हे कर्मचारी तुमच्यासोबत आहेत. उद्या सकाळी ९ वाजता तुमच्या चौकशीच्या ठिकाणी ते हजर राहतील. मानवतावादी दृष्टीकोनातून या कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी घरी जायला परवानगी द्या, अशी आम्ही मागणी केली. पण ईडीनं आमची मागणी धुडकावून लावल्याचं या कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

Hasan Mushrif
Satyajit Tambe: सत्यजीत तांबेंना बाळासाहेब थोरातांचा पाठिंबा? पोस्टरमुळे चर्चेला उधाण

या कर्मचाऱ्यांविरोधात समन्स असल्याचं सांगत त्यांना चौकशीसाठी न्यावं लागेल असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. आम्ही सर्वांनी ईडीला सहकार्य केलं आहे. पण आम्ही ईडीला इशारा देत आहोत की, या कर्मचाऱ्यांना मुंबईला नेण्यात येत आहे ते ताणतणावाखाली आहेत. जर या कर्मचाऱ्यांना कोणताही धोका झाला तर संबंधित अधिकाऱ्यांवर खटले दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, असा इशाराही कर्मचारी संघटनेनं दिला आहे.

हे ही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

जिल्हा बँकेत पूर्वी जे झालं ते दुरुस्त करण्यात आम्ही होतो मोर्चे काढून एका वर्षात ३७० कोटी रुपये वसूल करुन बँक आम्हीच वळणावर आणली. त्यानंतर इथं पुन्हा चुकीचं काही होऊ नये म्हणून आम्ही कायम प्रयत्नशील राहिलो आहोत. ईडीला चौकशीला अधिकार आहे पण या चौकशांपुढं काय होतं हे आम्हाला माहिती आहे, असंही कर्मचारी संघटनेनं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com