Jyotiba Temple : गुलालाची भव्य उधळण अन् चांगभलंचा गजर; विक्रमी गर्दीत जोतिबाची नगरप्रदक्षिणा, अडीच लाख भाविकांची उपस्थिती

नगर प्रदक्षिणेच्या (Jyotiba Dongar) इतिहासात यंदा प्रथमच गर्दीचा उच्चांक झाला.
Jyotiba Temple
Jyotiba Templeesakal
Summary

दरवर्षी जोतिबा डोंगराभोवती असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगे व अष्ट तीर्थ यांच्या दर्शनासाठी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणा निघते.

जोतिबा डोंगर : सकाळच्या प्रहरी डोंगरावरून (Jyotiba Temple) वाहणारे दाट धुके.. सोबतीला केवळ रिमझिम पावसाचा रंगलेला खेळ.. हिरव्यागार निसर्गाच्या साथीत... गुलालाची भव्य उधळण करीत 'यमाईदेवी-चोपडाई देवी, महादेव काळभैरव व जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे नगरप्रदक्षिणा सोहळा भक्तिमय वातावरणात झाला.

भजन किर्तनाच्या गजरात प्रदक्षिणेत सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली. नगर प्रदक्षिणेच्या (Jyotiba Dongar) इतिहासात यंदा प्रथमच गर्दीचा उच्चांक झाला. नुकत्याच झालेल्या श्रावण षष्ठी यात्रेला भाविकांची संख्या कमी होती. मात्र, या सोहळ्याला पूर्ण क्षमतेने राज्यभरातील भाविक दाखल झाले.

Jyotiba Temple
धक्कादायक! 'प्रेम करताना जात धर्म बघू नका'; स्टेटस्‌ ठेवून आंतरधर्मीय प्रेमी युगुलाची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या

यामुळे अख्खा डोंगर भाविकांनी फुलून गेला होता. दरवर्षी जोतिबा डोंगराभोवती असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगे व अष्ट तीर्थ यांच्या दर्शनासाठी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणा निघते. या सोहळ्यासाठी रविवारपासूनच भाविकांनी हजेरी लावली होती. काल पहाटेपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, कोकणातून भाविक दाखल झाले. सकाळी नऊ वाजता चांगभलंचा जयघोष करून मुख्य मंदिरातून या सोहळ्याला सुरुवात झाली.

Jyotiba Temple
Kolhapur Crime : 'तुम्ही गर्भलिंग निदान करून महिना दहा लाख मिळवता'; बनावट ACB अधिकाऱ्यांकडून डॉक्टरचं अपहरण, पोलिसांनी 'असा' लावला छडा

शिवाजी पुतळा दक्षिण दरवाजातून गजगतीने हा सोहळा गायमुख तलाव या ठिकाणी आला. या तलावच्या काठावरील श्री मल्लिकार्जुन मंदिरात आरती सोहळा व इतर धार्मिक विधी झाले. त्यानंतर दिंडी कोल्हापूर जोतिबा मार्गावर भीमाशंकर तीर्थाच्या परिसरात गेली. तिथून तो नंदीवन अंबावन, पांढरवन, नागझरी मंडोकतीर्थ, व्याघ्रतीर्थ, आंबा तसेच अष्टतीर्थांचे दर्शन घेऊन तो मुरगोळा या ठिकाणी आला.

या ठिकाणी महिलांनी झिम्मा फुगड्डीचा फेर धरला. पुढे तो गिरोली (ता. पन्हाळा) गावच्या निनाई देवीच्या मंदिरात गेला. तेथे आरती व धार्मिक विधी होऊन हा सोहळा परत याच गावच्या शिवारात तिथे मोठ्या दगडावर बारा ज्योतिर्लिंगच्या प्रतिकृती कोरले आहेत, तेथे गेला.

Jyotiba Temple
Highway Accident : बहीण-भावाचा 'तो' प्रवास ठरला अखेरचा; महामार्गावरील अपघातात दोघे जागीच ठार

तेथे दर्शन घेऊन तो पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) गावातील पांडव लेण्यात गेला. तेथून तो पुन्हा गायमुख तलाव या ठिकाणी आला. सायंकाळी साडेसात वाजता हा सोहळा यमाई मंदिरात गेला. भाविकांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर भाविकांना सुंटवडा वाटप करण्यात आला. त्यानंतर रात्री आठ वाजता या सोहळ्याची सांगता झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com