
Cooperative Bank Problems Kolhapur : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेने या आर्थिक वर्षात (२०२४-२५) ठेवींमध्ये तब्बल १० हजार ६३४ कोटी ४१ लाखांचा टप्पा गाठत ऐतिहासिक विक्रम केला आहे. नफ्यातील शाखांची संख्या १९१ वर पोहोचल्याचा दावा बँकेने केला आहे. संचालक मंडळाच्या अहवालात आकडे चमकदार दिसत असले तरी प्रत्यक्ष शाखांमध्ये पाय ठेवणाऱ्या ग्राहकांना मात्र ‘बँकिंगच्या प्रगती’ऐवजी ‘अव्यवस्थेचा अनुभव’ घ्यावा लागत आहे.