कोल्हापुरात पंपांवर रांगा! जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं पॅनिक बायिंग न करण्याचं आवाहन, म्हणाले, पुरेसा इंधन साठा

Kolhapur Collector on Petrol Pump Line गेल्या दोन दिवसांत पसरलेल्या चुकीच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यामुळे इंधन खरेदीसाठी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी उसळली आहे.
Panic Buying Triggers Long Queues at Petrol Pumps in Kolhapur

Panic Buying Triggers Long Queues at Petrol Pumps in Kolhapur

Esakal

Updated on

Kolhapur Fuel Rush Due to Rumours कोल्हापूर जिल्ह्यात आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांत पसरलेल्या चुकीच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यामुळे इंधन खरेदीसाठी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी उसळली आहे. या 'पॅनिक बायिंग'मुळे कालच्या एकाच दिवसात जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे पंपांवरील व्यवस्थापनावर मोठा ताण निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com