
म्हाकवे : श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील प्रगतिशील शेतकरी बाबूराव खोत यांच्याकडील खिलार जातीची माणिक व राजा ही बैलजोडी श्री संत तुकाराम महाराज देहू संस्थानने यंदाच्या आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी खरेदी केली आहे. या खिल्लारी बैलांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.