शाळकरी मुलांकडून मित्राचं रॅगिंग, ४० हजार उकळले; दागिने चोरल्यानंतर प्रकार उघडकीस

Kolhapur News : कोल्हापुरात एका नामांकित शाळेत नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्गातील मित्राचं रॅगिंग केल्याचं समोर आलंय. विद्यार्थ्याकडून ४० हजार रुपये उकळण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडालीय.
शाळकरी मुलांकडून मित्राचं रॅगिंग, ४० हजार उकळले; दागिने चोरल्यानंतर प्रकार उघडकीस
Updated on

शालेय मुलांनी रॅगिंग करून मित्राकडूनच ४० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय. क्रशर चौकात एका नामांकित शाळेत नववीत शिकणाऱ्या मुलांनी मित्राचेच रॅगिंग केलं. तसंच त्याच्याकडून वेळोवेळी पैसे उकळून ४० हजार रुपये लुटले. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. रॅगिंगमुळे घाबरलेल्या मुलाने सुरुवातीला याबद्दल कुणालाच माहिती दिली नाही. पण जेव्हा त्याने पैसे देण्यासाठी नसल्यानं घरातले दागिने चोरल्यानं हा प्रकार समोर आला.

शाळकरी मुलांकडून मित्राचं रॅगिंग, ४० हजार उकळले; दागिने चोरल्यानंतर प्रकार उघडकीस
Shirur Accident News: काड्यांचे घर अन्‌ पेन्सिलचे छप्पर उडून गेले, बापलेकांचा मृत्यू; सरकारी निष्काळजीपणाचे ठरले बळी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com