नेत्यांच्या पोटातील पाणी हलणार कधी?

जिल्ह्यात ३६ गावांना नावेचाच आधार; पूरकाळासह शेती आणि प्रवासी वाहतूकही
kolhapur
kolhapursakal

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील ३६ गावांमध्ये प्रवासी वाहतूक व शेतकामासाठी आणि महापुराच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नावेचा वापर केला जात आहे. विकासाचा डांगोरा कितीही पिटला तरी या गावांतील वस्तुस्थिती नेत्यांच्या पोटातील पाणी हलणार कधी, असा परखड सवाल उपस्थित करते. रस्‍ते, पूल बांधणीच्या खर्चापेक्षा पाण्यातील वाहतूक स्‍वस्‍त आणि वेळेची बचत करणारी आहे. अलीकडे काही ठिकाणी पूलच झाले असले तरी महापुरात या गावांना नावेशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांसाठी नाव म्‍हणजे जीव की प्राण आहे. असे असले तरी नवीन नावा खरेदी व आहे त्यांच्या दुरुस्‍तीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

kolhapur
शेततळ्यात पडून आईसह चिमुकलींचा मृत्यू

शिरोळ तालुक्यात सर्वाधिक वापर

जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात असलेले बारमाही नद्यांचे जाळे, पश्‍चिम घाटामुळे प्रचंड प्रमाणात पडणारा पाऊस व त्यामुळे नद्यांना येणार महापूर, हे दरवर्षीचे समीकरण आहे. यातही शिरोळ तालुक्यात कृष्‍णा, पंचगंगेच्या महापुरामुळे दरवर्षी हजारो लोकांना स्‍थलांतरित व्‍हावे लागते. महापुरात रस्‍ते पाण्याखाली जातात. त्यामुळे लोकांना नावेतूनच प्रमुख मार्गांवर आणावे लागते. तालुक्यातील तब्‍बल १७ गावांमध्ये कमी अधिक नावेचा वापर केला जातो. यातील बहुतांश गावांमध्ये महापुराशिवाय त दैनंदिन प्रवासी वाहतूक तसेच शेतकामासाठी नाव वापरली जाते. नदीकाठच्या गावांमध्ये आंबी समाजचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. ते नावाड्याचे काम करतात. त्यांचा चरितार्थच या नावेवर चालतो. शिरोळ तालुक्यातील सांगली जिल्‍ह्यातील तसेच कर्नाटकमधील अनेक गावांमध्ये जाता येते.

kolhapur
रखडलेल्या कामांसाठी निधी मंजूर; जिल्हाधिकाऱ्यांचा मंगळवेढा दौरा यशस्वी

नावा दुरुस्‍तीची व्यवस्‍था करावी

शिरोळशिवाय राधानगरी, गडहिंग्‍लज, शाहूवाडी आदी तालुक्यातही नावेचा वापर केला जातो. मात्र, तो शिरोळपेक्षा कमी प्रमाणात आहे. अनेक ठिकाणी पर्याय मार्ग, पूल झाले. त्यामुळे उर्वरित गावातील नावा महापुरातच वापरात येतात. जिल्‍हा परिषदेकडून दरवर्षी चार, पाच नावांची खरेदी होते. मात्र दुरुस्‍तीची मात्र तरतूद नाही. नावा दुरुस्‍त झाल्या नाहीतर पावसाळ्यात ग्रामस्‍थांची आणि प्रशासनाचीही गोची होते. त्यामुळे नावा दुरुस्‍तीचीही व्यवस्‍था करण्याची मागणी होत आहे.

शिरोळ तालुक्यात सर्वाधिक नावांचा वापर होतो. प्रवासी वाहतूक, शेतीकामासाठी तर नावा वापरल्या जातातच. मात्र, सांगली जिल्‍ह्यातील काही गावांत जाण्यासाठी व कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी नावांचा वापर होतो. खिद्रापूर व अन्य ठिकाणी पूल झाल्याने रस्‍त्यानेही प्रवास करणे शक्य आहे. महापुरात नावांचाच आधार आहे. दरवर्षी नावा खरेदी व दुरुस्‍तीसाठी निधी देणे आवश्यक आहे.

- राजवर्धन निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com