Illegal Liquor
Illegal Liquoresakal

Kolhapur : चंदगड तालुक्यात गोवा बनावटीची दारू जप्त; पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई

संशयित बुद्री याच्याकडे गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांची दोन लाख ३२ हजार ४८० रुपयांची दारू व तीन लाख पाच हजार रुपयांची मोटार जप्त करण्यात आली.
Summary

पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाने सापळा रचून कारवाई केली.

चंदगड : देवरवाडी (ता. चंदगड) गावच्या हद्दीत बेळगाव येथून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेली गोवा बनावटीची दारू व वाहन असा सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल येथील पोलिसांनी छापा टाकून पकडला. 

Illegal Liquor
Chandoli Dam : पावसाचा जोर वाढल्यास धरणातून केंव्हा ही पाणी सोडण्यात येणार; वारणाकाठी सावधानतेचा इशारा

संशयित सतीश यल्लाप्पा बुद्रि (वय २५, रा. बुद्रीअनुर, जि. बेळगाव) याला अटक केली. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल खुशाल शिंदे यांना बेळगाव येथून गोवा बनावटीची दारू चंदगड तालुक्यात विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली.

Illegal Liquor
आता महिन्याला कुटुंबप्रमुख महिलेच्या खात्यात जमा होणार 2 हजार; 'गृहलक्ष्मी'चा 14.71 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाने सापळा रचून कारवाई केली. संशयित बुद्री याच्याकडे गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांची दोन लाख ३२ हजार ४८० रुपयांची दारू व तीन लाख पाच हजार रुपयांची मोटार जप्त करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एम. मुल्ला अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com