ST Bus
ST Busesakal

Kolhapur : कागल ST आगाराला विठ्ठल पावला! आषाढी वारीतून मिळवले तब्बल 5 लाखाहून अधिक उत्पन्न

कागल एस. टी. आगाराला आषाढी वारीतून पंढरपूर मार्गावर ५ लाख १९ हजार ३८२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

कागल : कागल एस. टी. आगाराला आषाढी वारीतून पंढरपूर मार्गावर ५ लाख १९ हजार ३८२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. २५ जून ते ३ जुलैदरम्यान पंढरपूर - कोल्हापूर मार्गावर २३ बसेसच्या ५२ फेऱ्या झाल्या. ११ हजार ३७२ किलोमीटरच्या प्रवासात एस. टी. ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

ST Bus
MPSC PSI Result : कष्टाचं चीज झालं; गवंड्याच्या पोराची पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी

कागल आगाराला शाळांच्या सहली, उन्हाळ्यातील सुट्टया, कागल ऊरूस आणि पंढरपूरची वारी अशा विविध प्रसंगिक कार्यक्रमातून एस. टी.ला कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे नेहमीच्या मार्गावरील प्रवासी वाहतूक काही प्रमाणात कमी करून ज्यादा उत्पन्न मिळवून देणाऱ्या मार्गावर बसेस सोडल्या जातात.

आषाढी एकादशीला राज्यातील विविध भागातील भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाकरिता जातात. त्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस.टी. भाविकांच्या सोयीकरीता पंढरपूर मार्गावर जादा बसेस सोडते. कागल आगारानेही २५ जून ते ३ जुलैदरम्यान कोल्हापूर - पंढरपूर मार्गावर २३ बसेस सोडल्या होत्या.

ST Bus
MPSC PSI Result : पोरानं कष्टाचं पांग फेडलं! ऊसतोड कामगाराच्या मुलाची PSI परीक्षेत उत्तुंग भरारी

या काळात २३ बसेसच्या ५२ फेऱ्यांतून ११ हजार ३७२ किलोमीटर प्रवास केला. प्रतिकिलोमीटर ४५ रुपये ६७ पैसे दराने ३ हजार ९९२ प्रवाशांनी एसटीने प्रवास केला. यातून आगाराला ५ लाख १९ हजार ३८२ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

या मार्गावर एस.टी.चे भारमान ७१.५९ राहिल्याने एस.टी.ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत कागल आगाराच्या सात बसेस कमी होत्या. तरीही यातून आगाराला चांगले उत्पन्न मिळाले. आगार व्यवस्थापन आणि एस. टी. कर्मचाऱ्यांनी चांगली मेहनत घेतली.

दृष्टिक्षेपात...

  • बस -२३

  • फेऱ्या- ५२

  • प्रवास- ११, ३७२ किमी

  • प्रवासी- ३, ९९२

  • उत्पन्न- ५, १९, ३८२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com