लाईव्ह न्यूज

बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करणार मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करणार  मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
Published on: 

02451
मुगळी : विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ. सोबत पांडुरंग पसारे, कृष्णात गुरव, निवृत्ती पाटील, आदी.
.........
बांधकाम कामगारांना
२३ भांड्यांचा संच देणार

मंत्री मुश्रीफ ः मुगळीत विविध विकासकामांचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. ३१ : ‘बांधकाम कामगार महामंडळामध्ये आता १५ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला आहे. त्यातून शासन कामगारांसाठी विविध योजना राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच बांधकाम कामगारांना २३ भांड्यांचा संच दिला जाणार आहे,’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मुगळी (ता. कागल) येथे विविध विकासकामांच्या प्रारंभ व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘मी प्रत्येक गावामध्ये विकासकामे केली. त्या-त्या गावची आकडेवारी मी जाहीर करतो. संपूर्ण मतदारसंघातील विकासकामांची आकडेवारी जाहीर केली नाही. मी माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मतदारसंघाच्या विकासासाठी प्रचंड निधी आणला आहे.’
पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत म्हणाले, ‘मंत्री हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला कायमपणे पाठबळ देणारे नेते आहेत. म्हणूनच हे नेतृत्व जोपासले पाहिजे.’ उदय पसारे यांनी मनोगत व्यक्त केले.
आनंदा पाटील यांनी स्वागत केले. बाबासाहेब सांगले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास पांडुरंग पसारे, कृष्णात गुरव, निवृत्ती पाटील, जयसिंग पाटील, मुकुंद पाटील, परशुराम शिंदे, दयानंद साळवी, आदी उपस्थित होते.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com