Uchgaon Gram Panchayat news : ‘त्या’ मिळकती महापालिकेच्या हद्दीत उचगाव ग्रामपंचायतीला धक्का, सर्वोच्‍च न्यायालयाने स्थगिती उठवली

gram panchayat vs kolhapur municipal : महापालिका हद्द वादात महत्त्वाचा निर्णय; सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली. उचगाव ग्रामपंचायतीवर परिणाम होणार.
Uchgaon Gram Panchayat property dispute Supreme Court decision

Uchgaon Gram Panchayat property dispute Supreme Court decision

Updated on

Supreme Court stay lifted uchgaon kolhapur : उचगाव हद्दीतील वादातील मिळकती कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत, असा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. उचगाव ग्रामपंचायतीचे केलेले अपील फेटाळून लावले. अपील फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी असलेली ‘जैसे थे’ स्थितीसह अन्य सर्व आदेश, स्थगितीचे निकालही रद्द केले. यामुळे वादाच्या मिळकतीबाबत पुढील निर्णय महापालिका आता केव्हाही घेऊ शकते. यामुळे २०१३ पासून सुरू असलेला वाद आता कायमचा संपुष्टात आला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि के. व्ही. विश्‍वनाथन यांनी हा निकाल दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com