Vinay Kore
Vinay KoreEsakal

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक; आमदार विनय कोरे यांची माहिती

कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
Summary

घटस्थापनेच्या मुहूर्तावर तहसील कार्यालयासमोर जाफळेतील दोघांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण चालू केले आहे.

पन्हाळा : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक आहे. शासनाने याचिका दाखल करुन आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तरी उपोषण सोडावे, अशी विनंती डॉ. विनय कोरे यांनी केली. पण आंदोलक उपोषण चालू ठेवण्यावर ठाम राहिले.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर तहसील कार्यालयासमोर जाफळेतील दोघांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण चालू केले आहे. तिसऱ्या दिवशी उपोषणस्थळी आमदार डॉ. विनय कोरे यांनी जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते अॅड. राजेंद्र पाटील, बहिरेवाडीचे सरपंच रवींद्र जाधव, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे- जाधव यांच्यासमवेत भेट दिली.

Vinay Kore
Bar Council : ॲड. रणजितसिंह घाटगेंची सनद पाच वर्षांसाठी रद्द; 14 लाख दंड देण्याचा आदेश, काय आहे प्रकरण?

मंगळवारी आमदार डॉ. कोरे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चेवेळी चार मागण्यांपैकी जातीनिहाय जनगणनेस शासन अनुकूल आहे. कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. आर्थिक आरक्षणाच्या अनुषंगाने इडब्लूएस दाखले चालू आहेत. उर्वरित मराठा समाजाला आरक्षणासाठी शासन प्रयत्नशील आहे. मी मुख्यमंत्र्यांना उपोषणाबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारने दिलेली मुदत संपेपर्यंत उपोषण स्थगित करावे. असा आवाहन संदेश दिल्याचे आमदार कोरेंनी सांगितले. पण आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्ते पाटील व जगदाळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com