सोलापूर जिल्ह्यातील 'या' आमदारांनी घेतली शपथ

अशोक मुरुमकर
Wednesday, 27 November 2019

- भारत भालके, शहाजी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी घेतली शपथ
- प्रणिती शिंदेंसह इतर आमदारांच्या चेहऱ्या वर हस्य
- विधीमंडळात अजित पवार यांच्या मागच्या बाकावर भालके

सोलापूर : राज्यात सत्ता नाट्याचा अखेरचा अंक सध्या सुरु आहे. महिनाभरापासून सत्ता संघर्षात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. त्याचा मंगळवारी जवळजवळ समारोप झाला. उद्या (गुरुवारी) मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेऊन नवीन सरकार स्थापन करत आहेत. बुधवारी सकाळी विधीमंडळाचे कामकाज सुरु झाले. त्यात सोलापूर जिल्ह्यातील विजयकुमार देशमुख, शहाजी पाटील, भारत भालकेंसह इतर आमदारांनी शपथ घेतली आहे.

हेही वाचा : पवारांची फत्तेशिकस्त...
हे आहेत जिल्ह्यातील आमदार

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर मतदारसंघात सुभाष देशमुख, उत्तर सोलापूर मतदारसंघात विजयकुमार देशमुख, अक्कलकोट मतदारसंघात सचिन कल्याणशेट्टी व माळशिरस विधानसभा मतदारसंघात राम सातपुते हे भाजपच्या 'कमळ' चिन्हावर निवडून आलेले आहेत. तर सोलापूर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे या जिल्ह्यात काँग्रेसच्या एकमेव निवडून आलेल्या उमेदवार आहेत. माढा मतदारसंघात बबनराव शिंदे, पंढरपूर मतदारसंघात भारत भालके व मोहोळ मतदारसंघात यशवंत माने हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेले आहेत. सांगोला विधानसभा मतदारसंघात शहाजीबापू पाटील हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर विजयी झालेले आहेत. 

हेही वाचा : ७९ वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलानांना कळलेच नाहीत
करमाळा विधानसभा मतदारसंघातून संजय शिंदे हे राष्ट्रवादीच्या पाठिब्याने अपक्ष म्हणून निवडून आले. तर बार्शी मतदारसंघातून राजेंद्र राऊत हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.
बुधवारी सकाळी आमदारांचा शपथविधी सुरु झाला. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या स्वागतासाठी उपस्थित होत्या. प्रणिती शिंदे यांचे सुळे यांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. तेव्हा दोघींच्याही चेहऱ्या  हस्य होते.
-
हेही वाचा : महाविकासआघाडीचा मास्टरप्लॅन; पवारांकडे नेतृत्व
अजित पवारांच्या मागच्या बाकावर आमदार भालके

महाराष्ट्राच्या विधीमंडळात बुधवारी बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथ झाला. यावेळी विधीमंडळात अजित पवार यांच्या मागच्याच बाकावर भारत भालके हे बसल्याचे दिसले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The MLAs took oath in Solapur district