नगर जिल्ह्यात मुलांच्या भांडणावरून युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

घुलेवाडी येथील घटना; खुनाचा गुन्हा दाखल; दोघांना अटक

तळेगाव दिघे (जि. नगर): संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे लहान मुलीच्या भांडणावरून एका युवकाचा खून करण्यात आला. किरण कचरू कदम (वय ३०) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पती-पत्नी विरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घुलेवाडी येथील साठेनगर परिसरात लहान मुलीच्या भांडणावरून किरण कदम व भारत शिंदे यांच्या कुटुंबीयात वाद झाला. आरोपी भारत शिंदे याने किरण कदम याच्या गुप्तांगावर जबर मारहाण केली. त्यानंतर किरण कदम यास घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच किरण कदम याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी भारत शिंदे दांपत्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सी. आर. रजपूत करीत आहे. खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: nagar news Youth killed on the children's dispute