गडहिंग्लजला भर बाजारात एकाकडे सापडले गावठी बनावटीचे पिस्तूल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

ही पिस्तूल 55 हजार रूपये किमतीची असून सहाशे रूपये किमतीचे तीन जिवंत राऊंड आहेत. राऊंडवर KF7.65 असे लिहिलेले आहे. पोलिस कॉन्स्टेबल गजानन गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी आवढणविरूद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील बसस्थानकासमोरील दसरा चौक परिसरात पोलिस पथकाने 55 हजार रूपये किमतीचे विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल व तीन पितळी जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. याप्रकरणी विजय जोतिबा आवढण ( 24, रा. वैतागवाडी, ता. चंदगड) याला पोलिसांनी अटक केली आहे. आज दुपारी पावणेएकच्या सुमारास ही घटना घडली. 

अबब ! झाडांवर मारलेले खिळे निघाले सात किलोचे  

पिस्तूल विक्रीसाठी आल्याची खबर

येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील कॉन्स्टेबल राजासाब सनदी यांना एकजण विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी गडहिंग्लजच्या बसस्थानकाजवळ येत असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार सनदी यांनी उपअधीक्षक अंगद जाधवर व पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांना याची कल्पना दिली.

महाराष्ट्रातील हा तालुका गोव्यात विलिन करण्यावरून वादंग 

गडहिंग्लजमध्ये भर बाजारातच कारवाई

त्यानंतर पोलिस हवालदार श्री. ठिकारे, श्री. मुळीक, राजासाब सनदी, श्री. कांबळे, गजानन गुरव यांचे पथक खासगी वाहनाने बसस्थानकाजवळ जावून ठिकठिकाणी थांबले. दुपारी पावणेएकच्या सुमारास साधना बुक स्टॉलजवळ एकजण संशयीतरित्या फिरताना आढळला. त्याला पथकाने घेरले. त्याची अधिक चौकशी करता त्याच्या कमरेला स्टिल बॉडी व मुठीला तपकीरी रंगाची प्लास्टिक कव्हर असलेली गावठी बनावटीची पिस्तूल आणि डाव्या खिशात पितळी तीन जिवंत राऊंड सापडले. हा मुद्देमाल पोलिस पथकाने जप्त केला. अधिक चौकशीत त्याने आपले नाव विजय आवढण असे सांगितले.

फुटबाॅल स्पर्धेत चेन्नई, सिकंदराबाद, गोवा, पुणे उपांत्य फेरीत 

भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल

ही पिस्तूल 55 हजार रूपये किमतीची असून सहाशे रूपये किमतीचे तीन जिवंत राऊंड आहेत. राऊंडवर KF 7.65 असे लिहिलेले आहे. पोलिस कॉन्स्टेबल गजानन गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी आवढण याच्या विरूद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. शहरातील भरवस्तीत सापळा रचून पिस्तूल जप्तीची कारवाई केल्याची बातमी समजताच खळबळ उडाली आहे. 

धक्कादायक ! मिरज सिव्हीलमधील तीन रूग्णांना फेकले रस्त्यावर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pistol Seized in Gadhinglaj Kolhapur District