'या' पोलिस आयुक्‍तालयाने दिला महिलांना "भरोसा'

तात्या लांडगे
रविवार, 1 डिसेंबर 2019

- महिला सहायता कक्षाऐवजी सुरु केले भरोसा केंद्र
- डॉक्‍टर अन्‌ समुपदेशनासह 11 तज्ज्ञांची नव्याने नियुक्‍ती
-
कौटुंबिक हिसांचाराचा बळी ठरलेल्या महिलांना मिळणार निवारा
- महिलांसमवेत आलेल्या बालकांच्या मनोरंजनाचीही होणार सोय

सोलापूर : कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या व पतीसह सासरच्या व्यक्‍तींच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित महिलांचा तुटलेला संसार जोडण्यासाठी पोलिस आयुक्‍तालयातील महिला सुरक्षा कक्षाचे स्वरूप आता बदललेले असून त्याला "भरोसा' असे नाव देण्यात आले आहे. त्यासाठी समुपदेशक, डॉक्‍टर, वकील, संरक्षण अधिकारी, सेवाभावी संस्थांसह 11 जणांची नव्याने नियुक्‍ती करण्यात आली आहे.

 

हेही वाचा...अबब...729 पदांसाठी सव्वातीन लाख उमेदवार

माहेरची लुडबूड अथवा सासरच्या मंडळींकडून लहान-लहान गोष्टींवरून होणारा छळ व त्यातून पती-पत्नीतील विकोपाला गेलेला वाद मिटविण्यासाठी पोलिस आयुक्‍तालयात महिला सुरक्षा कक्ष सुरू करण्यात आला आहे. मात्र, सासरच्या मंडळींकडून छळ होण्याच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर तुटणारा संसार पुन्हा जोडावा या उद्देशाने महिला सुरक्षा कक्षाला "भरोसा' असे नाव देण्यात आले आहे. त्या माध्यमातून महिलांना पोलिसांकडून भरोसा दिला जात आहे. या भरोसा सेलच्या माध्यमातून आगामी काळात महिलांचा छळ होण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वासही पोलिस आयुक्‍तांनी व्यक्‍त केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिस आयुक्‍तालयात अशा स्वरुपाचे बदल अपेक्षित आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

 

हेही वाचा...नोटाबंदीवर अर्थतज्ज्ञ डॉ. जाखोटिया म्हणाले...

पोलिस आयुक्‍तालयातील महिला सुरक्षा कक्षात आता दोन वकील, दोन समाजसेवक तथा समुपदेशक, एक मानसोपचार तज्ज्ञ, दोन डॉक्‍टर, दोन संरक्षण अधिकारी, दोन सेवाभावी संस्थांतर्फे तात्पुरत्या राहण्याची सोय अशी नवी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे व उपायुक्‍त बापू बांगर यांच्या संकल्पनेतून नवी रचना करण्यात आली आहे.
- अभय डोंगरे, सहायक पोलिस आयुक्‍त, सोलापूर

 

हेही वाचा...खुषखबर...! या शहरात येणार 100 कृषी हवामान शास्त्रज्ञ

ठळक बाबी...
- पीडित महिलांच्या समुपदेशनासाठी महिला सुरक्षा कक्षात असणार स्वतंत्र कक्ष
- महिलांबरोबर आलेल्या बालकांसाठी मनोरंजनाचीही केली जाणार उत्तम सोय
- पीडित महिलांना निवारा मिळावा या उद्देशाने दोन सेवाभावी संस्थांची नियुक्‍ती
- संसारातील हेवेदावे दूर करून संसार पुन्हा आनंदी व्हावा या उद्देशाने बदललेले रूप
-
बालकांसाठी मनोरंजनाची तर महिलांसाठी निवाऱ्याची सोय
कौटुंबिक हिसांचाराच्या बळी ठरलेल्या महिलांसमवेत भरोसा केंद्रात आलेल्या बालकांसाठी मनोरंजनाची सोय केली जाणार आहे. तसेच माहेरी अथवा सासरी जायला तयार नसलेल्या महिलांसाठी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून तात्पुरत्या निवाऱ्याचीही सोय केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'This' police commission gives women "confidence"