डिफेक्टिव्ह नंबरवर कर्नाटकात पोलिसांची करडी नजर | Belgaum | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum po0lice

डिफेक्टिव्ह नंबरवर कर्नाटकात पोलिसांची करडी नजर

बेळगाव : विना नंबर प्लेट आणि डिफेक्टिव्ह नंबर(deffective number) असणाऱ्या वाहनाना पोलिसांनी आता विशेष लक्ष केले आहे. नंबर प्लेट व्यवस्थित नसेल तर तशी वाहने थेट जप्त करून पोलीस ठाण्यात(police station ) नेली जात आहेत. दंडाची रक्कम भरली तरी जोपर्यंत नवीन सदोष नंबरप्लेट बसविली जात नाही. तोपर्यंत वाहन पोलीस ठाण्यातून सोडले जात नसल्याने वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा: अस्वलाने मांडले शेतात ठाण; रेस्क्यूसाठी वनविभागाचे पथक दाखल

शहरात वाहन चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरीची वाहने नंबर प्लेट बदलून किंवा त्यात खाडाखोड करून वापरली जात आहेत. वाहन तपासणीवेळी अनेकवेळा चोरीची वाहने आढळून येत आहेत. तसेच वाहनाचा नंबर अत्यंत बारीक आणि इतर डिझाईन किंवा नावे मोठी काढली जात आहेत. त्याचबरोबर फॅनशी नंबर प्लेट वापरण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंगल करणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस रस्त्यावर थांबून कारवाई करतच आहेत. तर पोलिसांना चकवा देणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक नियमन कक्ष (टीएमसी) च्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरात भाडेकरूने मांडले ठाण; पोलिस मदतीला येताच...

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांचे नंबर टिपून त्यांना नोटिसा धडल्या जात आहेत. पण, विना नंबर प्लेट आणि डिफेक्टिव्ह नंबर प्लेटमुळे कॅमेऱ्यात ते नंबर स्पष्ट दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे ही बाब पोलिसांनी गंभीरपणे घेऊन तशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जप्त केलेल्या वाहनावर ठळक अक्षरात नंबर बसविल्यानंतरची जप्त केलेली वाहने पोलीस ठाण्यातून सोडली जात आहेत. रविवार (ता.३०) जानेवारी पासून पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. काल दिवभरात नंबर प्लेट प्रकरणी ६८ वाहने जप्त करण्यात आली होती. तर चुकीच्या दिशेला पार्किंग केल्या प्रकरणी ३० आटोरिक्षा जप्त करण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा: तडीपार आरोपीची पोलिसांना कोयता दाखवून धक्काबुक्की

डिफेक्टिव्ह नंबर प्लेट(fake) असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची सूचना पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा (belgaum police)यांनी दिली असल्याने तशा वाहनांवर कारवाई केली जाते आहे. वाहन चालकांनी वाहनांचे सर्व नंबर व्यवस्थित दिसतील अशा ठळक अक्षरात लिहिली पाहिजेत.

शरणाप्पा, एसीपी वाहतूक शाखा

Web Title: Police In Karnataka Keep A Close Eye On Defective Numbers Police Deputy Comissionor P Sneha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :policebelgaumnumber plate
go to top