आता क्रीडा स्पर्धांची नोंदणी ऑनलाइन! 

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 23 जुलै 2018

सातारा -  यंदापासून तालुका आणि जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने http://satara.mahadso.com/school/login.php. 

हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा एका क्‍लिकवर येणार आहेत. नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी पदभार स्वीकारत ‘हायटेक तंत्रा’चा वापर करण्यावर भर दिला आहे. 

सातारा -  यंदापासून तालुका आणि जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने http://satara.mahadso.com/school/login.php. 

हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा एका क्‍लिकवर येणार आहेत. नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी पदभार स्वीकारत ‘हायटेक तंत्रा’चा वापर करण्यावर भर दिला आहे. 

जिल्ह्यातील आंतरशालेय स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात तालुका दहा, जिल्हास्तरावर ४२ खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. यापूर्वी शाळेतील क्रीडा शिक्षकांना शाळेतील प्रत्येक खेळाची सांघिक आणि वैयक्तिक प्रवेशिका भरून घेऊन ती भरावी लागत होती. त्यावर मुख्याध्यापकांची सही घेऊन क्रीडा शिक्षकाला तालुक्‍यांतून जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागत होते. जिल्ह्यातील अनेक तालुके दुर्गम आणि डोंगराळ असल्याने शिक्षकांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयापर्यंत पोचायला विलंब होत असे. तसेच काही त्रुटी असल्यास दुरुस्त करण्यात नाहक वेळ जात होता. क्रीडा शिक्षकांचा वेळ वाचावा तसेच प्रवेशिका भरताना पारदर्शकता वाढावी, यासाठी यंदापासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे क्रीडा शिक्षकांना सॉफ्टवेअरचा सराव व्हावा यासाठी येत्या २७ पर्यंत तात्पुरता प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यात काही अडचणी येत असल्या तर लगेचच क्रीडा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत. 

...अशी होईल नोंदणी 
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रवेशासाठी लिंक देण्यात आलेली आहे. यासाठी प्रत्येक शाळेला यूडायस नंबरने लॉगिन करून माहिती भरावी लागणार आहे. यात शाळेची नोंदणी, पासवर्ड बदल, प्राथमिक नोंदणी, शुल्क भरणे प्रकिया, खेळाडू नोंदणी आणि वैयक्तिक आणि सांघिक प्रवेशिका भरता येईल. 

ऑनलाइनचे फायदे... 
ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शाळांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. यात प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्या, त्यातील मुले आणि मुलींची संख्या, खेळातील त्यांचा सांघिक आणि वैयक्तिक सहभाग याची नोंद होईल. खेळाडूंची वैयक्तिक व सांघिक माहिती मिळाल्याने विद्यार्थ्याचा नेमका कोणत्या खेळात सहभाग असल्याचे कळेल. वयोमर्यादेपेक्षा जादा असलेले विद्यार्थी खेळवण्याचे प्रकार बंद होतील. तसेच खेळाडूची जन्मतारीख नोंद केल्यानंतर ती कायम राहणार आहे. खेळाडूंची छायाचित्रासह नोंदणी होणार असल्याने बोगस खेळाडूंना पायबंद बसणार आहे.

Web Title: Register now sports competitions online

टॅग्स