फलटण तालुक्यात जोरदार पाऊस; 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद

संदीप कदम
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

अतिवृष्टीमुळे पश्चिमेकडील भागात बाजरीच्या पिकाचे नुकसान झाले

फलटण : फलटण तालुक्यात जोरदार पावासाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. आज सकाळी ७ पर्यंत झालेला महसूल मंडलनिहाय पाऊस खालीलप्रमाणे मिलीमीटरमध्ये- फलटण ९० मिमी, तरडगाव १३२ मिमी, आदरकी ११५ मिमी, आसू ८० मिमी, वाठार निंबाळकर   ७२ मिमी. बरड  ६८ मिमी,  राजाळे ६३ मिमी, गिरवी ४० मिमी, होळ ३९ मिमी याप्रमाणे महसूल खात्याकडील नोंदी आहेत.

धोमबलकवडीच्या कालव्यामध्ये पावसाचे पाणी धुसल्याने आदर्की नजीक बोडकेवस्ती शेजारी कावल्यातील अतिरिक्त पाण्यामुळे भरावास भगदाड पडले. यामध्ये बोडकेवस्तीवरील एका घरात याचे पाणी घुसल्याने घरातील संसारउपयोगी साहित्यासह घराचे नुकसान झाले.
तर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिमेकडील भागात बाजरीच्या पिकाचे नुकसान झाले असून वाघोशी परिसरात ऊसाचे पिक ही आडवे झाले असून लाखोेंचे नुकसान झाले आहे.

गेले 24 तासात  झालेला पाऊस
शिरवळ - 34 मिलीमीटर 
लोणंद - 59.2 मिलीमीटर 
वाठार - 55 मिलीमीटर 
खंडाळा - 34 मिलीमीटर

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

Web Title: satara news phaltan taluka rainfall