गुन्ह्याचा सखोल चौकशी करून अहवाल द्यावाः नांगरे-पाटील

vishwas nangre patil
vishwas nangre patil

कऱ्हाड (सातारा): ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीवेळी येथे वडगाव हवेली येथील मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांच्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सातारा गुन्हे प्रकटीकरण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक पवार यांनी सखोल चौकशी करून त्याचा आठ दिवसात अहवाल द्यावा, असे आदेश विषेश पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आज (शुक्रवार) पत्रकारांशी बोलताना दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीवेळी येथे जोरात जल्लोष झाला. त्यावेळी दोन गटात वाद झाला. त्यावर नियंत्रण ठेवताना पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. त्यावेळच्या स्थितीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला होता. त्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दलचा गुन्हा काही कार्यकर्त्यांवर दाखल झाला होता. त्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर नाहक मारहाण केली आहे. त्याबाबत कार्यकर्त्यांनी हरकत नोंदवली होती. पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही संबधितांनी केली आहे.

काही दिवसांपासून तहसीलदार कार्यालयाबाहेर काही त्यांचे दिवसा धरणे आंदोलन सुरू होते. त्यात चौकशी करण्यासाठी विषेश पोलिस महानिरिक्षक श्री. नांगरे-पाटील आज येथे आले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. पोलिसांवर अन्याय होवू नये, चुकीच्या पद्धतीने जातीवचाक शिवीगाळ प्रकरणाचा गुन्हा दाखल होवू नये, यासाठी त्यांची भेट घेवून त्यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदनही देण्यात आली. त्यांच्या शिष्टमंडलांशीही श्री. नांगरे-पाटील यांनी चर्चा केली. त्यावेळी पारदर्शीपणे या प्रकरणाची चोकशी होईल, यावार कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही श्री. नांगरे-पाटील मराठी क्रांतीच्या शिष्टमंडळास दिली. त्यानंतर नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. नांगरे-पाटील, ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी झालेल्या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली आहे. त्यानुसार त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांची नेमणूक केली आहे. त्याची सखोल चौकशी करतील. त्यांना आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी झालेल्या लाठीमारापेक्षा अटक केल्यानंतर पोलिसांनी माराहण केलेल्या मारहाणीवर त्यांचा आक्षेप आहे. तशी संबधितांची तक्रार आहे. त्यातस जातीवाचक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याचीही त्यांची मागणी आहे. पोलिसांनी बळाचा वापर केला आहे. मात्र तो किती गरजेचा होता, याची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्याबाबतची जबाबदारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक पवार यांच्याकडे आहे. ते सखोल चौकशी आठ दिवसात त्यांचा अहवाल देतील. त्यात जे निष्पन्न होईल, त्यानुसार कोणती कारवाई करम्याचा निर्णय गेण्यात येईल. ती करताना चौकशी व त्यानंतरची कारवाई निपक्षपातीपणे होणार आहे. ज्यांनी तक्रार केली आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दलचा त्या लोकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपासा सातारा येथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. ते त्याचा सखोल तपास करतील. त्यात अडथळा येवू नये, यासाठी मारहाण केल्याबद्दलचा आरोप असलेले सहायक पोलिस निरिक्षक हनुमंत गायकवाड यांची आठ दिवसासाठी पोलिस मुक्यालयात बदली करण्यात आली आहे. चौकशीत काय निष्पन्न होईल, त्यावर त्यांच्या पुन्हा बदलीचा विचार करण्यात येईल.

मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन
मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल होवून कोणावरही अन्याय नये, या मागणीचे मराठा क्रांती मोर्चा तर्फे विश्वास नागंरे-पाटील यांना देण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने श्री. नांगरे-पाटील यांची भेट घेतली. त्यांनी अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी या प्रकरणाची पारदर्शीपणे चौकशी व्हावी, चुकीच्या पद्दतीने गुन्हा दाखल झाल्यास त्याचा चुकीचा मेसेज जाईल, त्यामुळे कोणावरही अन्याय होवू नये, याची काळजी घ्यावी, या मागणीचे निवदेन श्री. नांगरे-पाटील यांना देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com