esakal | Video : कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय...
sakal

बोलून बातमी शोधा

Video : कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय...

दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम मिळालेली नाही. तसेच कारखान्याला यावर्षीचा गाळप परवानाही दिला गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Video : कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : "कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय..., शेतकरी संघटनेचा विजय असो.., ऊस आमच्या घामाचा, नाही कुणाच्या बापाचा..,' अशी घोषणाबाजी करत साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्‍सच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिले मिळण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच बेमुदत ठिय्या आंदोलन केले. 

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले की, न्यू फलटण शुगरला शेतकऱ्यांनी घातलेल्या उसाचे बिल दोन वर्षांपासून थकीत आहे. पैसे मागण्यासाठी कारखान्यावर गेलेल्या शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापनाने केला. यावेळी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर ऊस बिले देण्याचे श्री दत्त इंडिया कंपनीने आश्‍वासन दिले होते. तसेच कंपनीने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची सूचनाही त्यांनी दिली होती. मात्र, तेथील कर्मचारी व व्यवस्थापनाने कोणतीही मदत केलेली नाही. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी परिसरातच तळ ठाेकला.  

वाचा : ...अन्‌ तेजसचे लष्कर भरतीचे स्वप्न हवेत विरले

शेतकऱ्यांची थकीत रक्कम 47.87 कोटी रुपये असताना शेतकऱ्यांना केवळ 25 कोटी रुपये देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. मुळात शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम व्याजासह मिळावी, अशी मागणी आहे. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम मिळालेली नाही. तसेच कारखान्याला यावर्षीचा गाळप परवानाही दिला गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या घाेषणांमुळे परिसर दणाणून गेला. 

वाचा : बाप जन्मात मी कुणाला मुजरा घातला नाही; फलटणच्या राजेंनी भाजपात जावे

हेही वाचा :  Video : ती बाेलवते पण आपण जायचे नाही

नक्की वाचा : कानून के हात बडे लंबे हाेते है...इथं तर

जरुर वाचा : भिऊ नका : पोलिस दल महिलांच्या पाठीशी

loading image